
Ram Navami 2025: आज देशभरात राम नवमीचा सण मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा केला जात आहे. रामनवमीनिमित्त अभिजित मुहूर्तावर अयोध्येतील राम मंदिरात श्री रामलाला यांच्या कपाळावर सूर्य तिलक लावण्यात आला. हा दुर्मिळ योगायोग सुमारे चार मिनिटे होता. संपुर्ण जग या अभूतपूर्व क्षणाचे साक्षीदार झालेत. मंदिरात सूर्यतिलकांसोबत आरती करण्यात आली. याआधी मंदिराचे दरवाजे काही काळासाठी बंद करण्यात आले होते. सूर्यटिळक स्पष्टपणे दिसावे म्हणून गर्भगृहातील दिवे बंद करण्यात आले.