

Rashmika Mandanna and Vijay Deverakonda’s Kodava Wedding
Sakal
Coorg Kodava marriage rituals explained: तेलुगू पद्धतीतील सकाळच्या विधीनंतर दुपारी आणि संध्याकाळी अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि अभिनेता विजय देवरकोंडा यांनी रश्मिकाच्या मातृसंस्कृतीचा सन्मान करत पारंपरिक कोडावा (कूर्गी) पद्धतीने लग्नाचा दुसरा टप्पा साजरा केल्याचं समोर आलं आहे.
भारतीय लग्न म्हटलं की पुरोहित, मंत्रोच्चार आणि अग्निपूजा हे चित्र आपोआप डोळ्यांसमोर येतं. त्याचही दाक्षिणात्य लग्नसोहळा म्हणजे संपूर्ण साग्रसंगीत. मात्र रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांनी केलेल्या लग्नपद्धतीने ही सगळी चौकट मोडून काढली आहे.
कोडावा विवाहसोहळा हा ना वेद, ना फेरे, ना अग्नि; तरीही हे काहीच नसताना देखील तितकाच पवित्र आणि अर्थपूर्ण मानला जातो. निसर्ग, पूर्वज आणि समुदायाला साक्षी मानणाऱ्या या कूर्गी परंपरेत प्रत्येक विधीमागे खोल सांस्कृतिक अर्थ दडलेला आहे. नेमक्या कोणत्या रितीरिवाजांमुळे हा विवाह इतरांपेक्षा वेगळा ठरतो, ते जाणून घेऊया.