बिअर केसांना लावून धुतल्याने काय परिणाम होतात? जाणून घ्या

बिअर केसांसाठी कशी वापरायची याविषयी नीट माहिती नसेल तर समस्या निर्माण होऊ शकतात
beer for hair wash
beer for hair washgoogle

बिअर प्यायल्याने काय फायदे-तोटे होतात ते आता सगळ्यांना माहिती आहे. पण अनेकजण बिअर(Beer) केसांना लावून केस धुतात. असे बिअर शाम्पूही मिळतात. पण जर तुम्हाला एकूणच बिअऱ केसांसाठी (Hair) कशी वापरायची याविषयी नीट माहिती नसेल तर समस्या निर्माण होऊ शकतात. तुम्हाला माहिती आहे का की प्रत्येक बिअर तुमच्या केसांसाठी चांगली नसते? जर तुम्ही नीट काळजी घेतली नाही तर, तुमच्या केसात अधिक गुंतागुंत निर्माण होऊ शकते. म्हणूनच तुमच्या केसांसाठी बिअर कशी आहे आणि ती वापरण्याची योग्य पद्धत समजून घेणे गरजेचे आहे.

beer for hair wash
नियमित बिअर प्यायल्याने शरीरावर होतात चार परिणाम, जाणून घ्या

बिअरने केस धुणे चांगले आहे का ? (Why is washing hair with beer good?)

बीअरमध्ये व्हिटॅमिन बी चे प्रमाण भरपूर असते. त्यामुळे तुमचे केस मजबूत - चमकदार होण्यासाठी मदत मिळते. बिअरमधील सक्रीय असणारे घटक माल्ट - हॉप्समध्ये आढळणाऱ्या प्रथिनांमुळे तुमचे खराब झालेले केस चांगले होतात. तर सुक्रोज - माल्टोज शर्करा केसांच्या क्यूटिकलवर काम करतात . त्यामुळे तुमचे केस मजबूत आणि चमकदार होतात. जर तुमच्या केसांची चमक कमी असेल, तर व्हॉल्यूम आणि चमक पुन्हा आणण्यासाठी तुम्ही केसांना बिअऱ लावू शकता.

beer for hair wash
Red Wine रोज प्यायल्याने शरीरावर होतात पाच परिणाम
Beer
Beer esakal

केस धुण्यासाठी कशाप्रकारे वापर कराल? (how you can use beer to wash your hair)

अनेक लोकं शॅम्पू बनविण्यासाठी बीअरचा वापर करतात. किंबहुना, खराब झालेले केस पुन्हा चांगले करण्यासाठी डी-कार्बोनेटेड बिअर कंडिशनर म्हणूनहीवापरले जातात. बिअर तयार करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या हॉप्समध्ये जे सिलिका अशते त्यामुळे केसांची मूळं बळकट होऊन केस वाढण्यास मदत मिळते. केसांवर बिअर वापरण्यापूर्वी, तुम्हाला बिअर पाण्यात मिसळून वापरणे गरजेचे आहे. तशीच वापरल्यास त्याचा दुष्परिमाण केसांना होऊ शकतो. बिअरमध्ये झिंक, फोलेट, बायोटिन, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी सारखे पोषक घटक असतात. केसांचे आरोग्य राखण्यासाठी हे सर्व घटक महत्त्वाचे असतात. या पोषक तत्वांची कमतरता असेल तर एंड्रोजेनिक अलोपेसिया आणि टेलोजन इफ्लुव्हियम अशा समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे केस गळू लागतात. तसेच केसांचे नुकसान होऊ शकते.

beer for hair wash
हेयर ट्रांसप्लांट करण्याकडे युवावर्गाचा कल अधिक डॉक्टर म्हणतात...
BEER
BEERGOOGLE

याविषयी त्वचारोग तज्ज्ञ डॉ. निवेदिता दादू म्हणाल्या की, केसांना बीअर वापरण्यापूर्वी, तुम्ही केस पाण्याने स्वच्छ धुतले पाहिजेत. नंतरच पाण्यात एकत्र करून हा बिअर शाम्पू वापरला पाहिजे. मात्र हा शाम्पू वापरल्यानंतर कंडिशनर वापरू नका, कारण बिअरचा वापर केसांना कंडिशनरसारखाच होतो. केसांवर बिअर वापरण्यापूर्वी, तुम्हाला बिअर डी-कार्बोनेट करणे गरजेचे आहे. यासाठी एका भांड्यात बिअर घालून ती रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. जेणेकरून हवेच्या संपर्कात आल्यानंतर ऑक्सिडाइझ होईल. केसांवर वापरण्यापूर्वी आधी तुमच्या त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घ्या, असेही त्यांनी सांगितले.

beer for hair wash
मुलींनो, हेअरस्टाईलसाठी पर्याय शोधताय! 'हे' पाच प्रकार आहेत ट्रेंडमध्ये

केसांना कोणत्या प्रकारची बिअर लावावी?( What kind of beer should you opt for to wash your hair?)

बिअर प्यायल्याने तुम्हाला डिहायड्रेट किंवा शुष्कपणा, कोरडेपणा जाणवू शकतो. त्यामुळे हे लक्षात ठेवून आधी कमी अल्कोहोल असलेली बिअर निवडा. ते शक्य नसल्यास, ते थोडेसे पाणी त्यात घालून पातळ करा. त्यामुळे कदाचित तुम्हाला हलके वाटेल.

बिअर कोणी वापरावी?

- खराब केस असलेले लोक. मुख्यत: स्प्लिट-एंड असलेले

- कर्ल असलेले लोक, बीअर लावल्याने त्यांच्या केसांना चमक येऊ शकते.

- wavy hair असलेले लोक बीअर वापरून त्यांचे केस सरळ करू शकतात.

beer for hair wash
हिवाळ्यात कर्ली हेअर्सची चिंता सतावतेय, अशी घ्या काळजी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com