नियमित बिअर प्यायल्याने शरीरावर होतात चार परिणाम, जाणून घ्या| Beer Effect On Body | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Beer Effect On Body
नियमित बिअर प्यायल्याने शरीरावर होतात चार परिणाम, जाणून घ्या| Beer Effect On Body

नियमित बिअर प्यायल्याने शरीरावर होतात चार परिणाम, जाणून घ्या

तुम्ही रोज बिअर पिता का? रोज मद्यपान (Drink) केल्याने शरीराला अपाय होतात. पण प्रसंगानुरूप आणि प्रमाण मर्यादित ठेवून सेवन केल्यास तुमच्या शरीराला (Health) अनेक प्रकारे मदत होऊ शकते. मद्यपान वाईटच आहे. तरी बिअऱचे जर तुम्ही मर्यादेत सेवन केले तर तुमचे आरोग्य सुधारते.

बिअर पिणे खरच हेल्दी आहे का? ( Is Beer Really Healthy?)

बिअर आरोग्यासाठी चांगली की वाईट हा अनेक वर्षांपासून वादाचा मुद्दा आहे. अल्कोहोलचे नियमित सेवन केल्यास त्याचा यकृत आणि किडनीवर वाईट परिणाम होतो. मात्र, काही अभ्यासांनी असा दावा केला आहे की, बिअरचे मध्यम प्रमाणात सेवन केल्यास त्याचा आरोग्यावर चांगला परिणाम होऊ शकतो. न्यूट्रिएंट्समध्ये प्रकाशित झालेल्या मेटा-विश्लेषणानुसार, स्पेनमधील पोषण आणि अन्न विज्ञान तज्ञांच्या टीमने 2007 ते 2020 या कालावधीतील अनेक अभ्यासांचे परीक्षण केले. त्यानुसार बिअरसारखे अल्कोहोलिक पेयं संपूर्ण आरोग्यावर आणि जीवनशैलीवर कसा परिणाम करतात याचे निरीक्षण केले. बिअरमधील नैसर्गिक संयुगेचा वापर आरोग्यावर सकारात्मक परिणाम करू शकतो, असे अभ्यासामध्ये अधोरेखित करण्यात आले आहे.

हेही वाचा: मद्यालाही असते Expiry Date! बाटली ओपन केल्यानंतर किती काळ टिकते जाणून घ्या

heart

heart

हृदयाच्या आऱोग्यावर परिणाम (Impacts Heart Health)-

अनेक अभ्यासांच्या निष्कर्षात, तज्ञांना आढळून आले की मध्यम प्रमाणात बिअर प्यायल्याने हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्यावर संरक्षणात्मक प्रभाव पडतो. एका अभ्यासात असे आढळून आले की जे पुरूष दर आठवड्याला 13.5 औन्स बीअर पितात त्यांचे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधीचे आरोग्य टीटोटलर्सच्या(teetotalers) तुलनेत चांगले असते. पण मर्यादित पिणे गरजेचे आहे.

हेही वाचा: स्त्रियांचे मद्यपान करण्याचे प्रमाण पुरूषांपेक्षा अधिक, अभ्यासात स्पष्ट

Diabetes

Diabetes

बिअर आणि मधुमेह- (Beer And Diabetes)

मद्यपान केल्याने शरीरातील इन्सुलिनची पातळी बिघडू शकते. मधुमेह असलेल्या लोकांनी मद्यपान अजिबात करू नये. मेटा निष्कर्षानुसार अधूनमधून बिअर घेणार्‍या पुरुषांच्या तुलनेत परावृत्त करणार्‍यांना ग्लुकोज संवेदनशीलता विकसित होण्याचा धोका जास्त असतो. कमी प्रमाणात बिअर पिल्याने पुरुषांमध्ये मधुमेहापासून संरक्षण होण्यास मदत होते. पण मर्यादित सेवन करणे गरजेचे आहे.

हेही वाचा: हाडे मजबूत राहण्यासाठी कॅल्शियमच का? पाच घटकांचाही करा आहारात समावेश

Bones

Bones

हाडांसाठी चांगली (Good For Bone Health)

बिअरमध्ये असलेल्या नैसर्गिक संयुगांमुळे हाडांची घनता मजबूत होते . न्यूट्रिएंट्सजर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, बिअरचे कमी प्रमाणात सेवनाने फ्रॅक्चरची जोखीम कमी होते. याचे श्रेय बिअरमधील नैसर्गिक घटकांना दिले जाते (उदा. फायटोएस्ट्रोजेन्स जसे की 8-प्रीनिलनरिंगेनिन) जे ऑस्टिओब्लास्ट पेशींना उत्तेजित करण्यासाठी सिलिकॉनसह सक्रियपणे कार्य करतात. यामुळे हाडे आणि दातांचे आरोग्य सुधारते."

हेही वाचा: ग्रुपबरोबर एकत्र खाल्ल्याने वाढते वजन, अभ्यासातील निष्कर्ष

cholesterol

cholesterol

बिअरमुळे कोलेस्ट्रॉल कमी होऊ शकते? (Beer May Reduce Cholesterol)

अभ्यासानुसार, बिअरमध्ये अल्कोहोलची पातळी 5% ते 7% कमी आहे, हे सिद्ध झाले आहे. तसेच यात अँटिऑक्सिडंट्स, खनिजे आदी नैसर्गिक घटक असल्यामुळे ते कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करतात. परंतु बीअरचे सेवन खूपच कमी असावे याची खात्री करा. तसेच या पेयातील अँटिऑक्सिडंट्स ऑक्सिडेटिव्ह तणावामुळे होणारे पेशींचे नुकसान कमी करण्यात मदत करू शकतात.

beer

beer

खूप काळजी घेणे गरजेचे

खूप कमी प्रमाणात बीअर पिणे तुमच्या शरीराला सकारात्मक मार्गाने मदत करू शकते, परंतु निरोगी आणि तंदुरुस्त राहण्याचा हा एकमेव मार्ग नाही. जर तुम्ही निरोगी राहण्याचा प्रयत्न करत असाल तर, संतुलित आहार घेणे ही मुख्य गोष्ट आहे. तज्ञांच्या मते, महिलांसाठी एक पेग आणि पुरुषांसाठी जास्तीत जास्त दोन पेग आरोग्यदायी योग्य मानले जाते. पण, दर तुम्हाला कोणता आजार असेल तर, मद्यपान करणे टाळावे. खूपच इच्छा झाली तर डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा. मात्र कोणतेही मद्यपान मर्यादित प्रमाणातच करावे.

Web Title: Read About What Happens When You Drink Beer Regularly

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top