रेड वाइनपासून तयार केलेला फेसपॅक चेहऱ्याला ठेवतो ऑइल फ्री 

red wine face pack homemade with special tips for women in kolhapur
red wine face pack homemade with special tips for women in kolhapur
Updated on

कोल्हापूर : तुमचीच स्कीन कोणत्याही प्रकारची असो. त्वचेसाठी होममेड फेसपॅक ऐवजी हा उत्तम उपाय आहे. गरमीच्या दिवसांत अधिकतर लोकांची स्कीन ऑयली होते. त्यामुळे माती धुळ हे चेहऱ्यावर चिकटले जातात. त्यामुळे चेहऱ्यावर पिंपल, पोर्स येणे किंवा त्वचेशी संबंधित अनेक समस्या सुरू होतात. यासाठी गरमीमध्ये चेहरा वेळच्या वेळी धुऊन स्वच्छ केला पाहिजे. गरमीच्या हंगामात ऑईली स्किनसोबत होणाऱ्या काही अडचणींपासून सुटकारा पाहिजे असेल तर नैसर्गिक उपाय हा सगळ्यात उत्तम मानला जातो. रेड वाइनपासून बनवलेला फेस पॅक स्किनवर जादू प्रमाणे काम करतो. चेहरा सोबत त्वचाही हायड्रेड करतो. काही महिला याचा क्लिंजर, स्क्रब म्हणूनही वापर करतात. रेड वाइनला स्किन केअर रुटीने मधील समाविष्ट केले जाते.

रेड वाइन आणि ग्रीन टी फेसपॅक

साहित्य - 

  • ग्रीन टी बॅग- 1
  • गरम पाणी- अर्धा कप
  • दही - 1 चमचा
  • रेड वाइन - 2 चमचे

कृती -

गरम पाण्यात ग्रीन टी बॅग घाला. आणि ते साधारण पाच ते तीन मिनिटांसाठी तसेच सोडून द्या. पाच मिनिटानंतर यामध्ये फ्रेश दही मिक्स करा. आणि दोन चमचे वाइन घाला. लक्षात ठेवा ही पेस्ट गाढी व्हावी लागेल. आता ही पेस्ट तुमच्या चेहऱ्याला लावू शकता. आणि हलक्या हाताने मसाज करा. तीन-चार मिनिटांनी मसाज केल्यानंतर पंधरा मिनिटांसाठी ते सोडून द्या. आणि कोमट पाण्याने साफ करा. आठवड्यातून हा फेसपॅक दोन वेळा वापरू शकता. यामुळे तुमचा चेहरा उजळू शकतो.

रेड वाइनमुळे त्वचा राहील हायड्रेड

साहित्य - 

  • रेड वाइन- 3 चमचे
  • ड्राई फेस शीट मास्क - 1


कृती -

कडक उन्हामुळे तुमच्या त्वतेवर जळजळ होते. यामुळे चेहऱ्याला साफ करण्यासोबतच डीहायड्रेड ठेवणेही जरुरीचे असते. हायड्रेड करण्यासाठी एका बाउलमध्ये तुम्ही तीन चमचे रेड वाइन घेऊन त्यामध्ये ड्राय फेस मास्क मिक्स करू शकता. आता ही शीट चेहऱ्याला लावू शकता. पाच किंवा दहा मिनिटांनी ते  बाजूला करुन त्यानंतर साफ टॉवेलने तुम्ही चेहरा स्वच्छ करू शकता

रेड वाइन आणि मध यांचा फेसपॅक 

साहित्य - 

  • दही- 2 चमचे
  • रेड वाइन- 2 छोटे चमचे
  • मध- 1 चमचा


कृती -

सुरुवातीला एका बाऊलमध्ये दही घ्या आणि त्यात मध टाका. चमच्याने हे दोन्ही व्यवस्थित मिक्स करा. यामध्ये रेड वाईन घाला. रेड वाईन घातल्यानंतर स्मूद पेस्ट तयार होईल. आता या पेस्टला चेहऱ्याला आणि मानेला लावा. त्वचेला लावल्यानंतर वीस मिनिटे ते तसेच ठेवा. या नंतर चेहरा स्वच्छ करा आणि ही किमान आठवड्यातून दोन वेळा ट्राय कर

चेहऱ्याची स्किन अधिक सेंसिटिव असेल किंवा रेड वाइन अथवा रेड वाईनचा फेसपॅक लावल्यानंतर काही समस्या किंवा अलर्जी होत असेल तर यापासून सावध रहा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com