Relationship Tips : नात्यातील हे सिक्रेट्स कधीच कोणाला सांगू नका ; होतील वाईट परिणाम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Relationship Tips

Relationship Tips : नात्यातील हे सिक्रेट्स कधीच कोणाला सांगू नका ; होतील वाईट परिणाम

पूणे : पती पत्नीचे नाते हे प्रेमाचे पवित्र असते. त्या नात्यात अनेक चांगल्या वाईट गोष्टी दडलेल्या असतात. चांगल्या गोष्टी इतरांना सांगणे ठिक आहे. पण, तूमच्या दोघांमधील वाईट गोष्टी कधीही कुणाशी शेअर करू नका. यामुळे नात्यावर तर वाईट परिणाम होतोच पण त्याच बरोबर लोकांमध्ये जोडीदाराला मान खाली घालावी लागेल. असे झाल्याने नाते किती टिकेल हे काही सांगता येत नाही.

हेही वाचा: Relationship Tips : दिवाळीमुळे घरातलं काम वाढलंय ? जोडीदाराला अशी करा मदत

जोडीदाराबद्दल आपण कुटुंबातील सदस्यांसमोर किंवा मित्रांसमोर खूप बोलतो. तूमच्यातील भांडणाबद्दल एखाद्याला सांगताना आपण भावनेच्या भरात तूमच्यातील काही गुपित सांगून बसतो. शेवटी तूमचे सिक्रेट्स हि काही खिरापत किंवा प्रसाद नाही सगळ्यांशी शेअर करत बसायला. त्यामुळे तूमच्यातील कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी शेअर करू नयेत हे पाहुयात.

हेही वाचा: Relationship Tips: तुमचा पार्टनर तुम्हाला यूज करतोय का? असे ओळखा

आर्थिक स्थितीबद्दल सांगू नका

तूमच्यातील भांडण वाद मित्रांना सांगण चुकीचे नाही. पण, जोडीदाराच्या आर्थिक स्थितीबद्दल कधीच कोणाला काही बोलू नये. घरातील आर्थिक अडचणी कधीही इतरांसोबत शेअर करू नयेत. या दोघांच्या वैयक्तिक बाबी आहेत. तसेच, तूम्ही दोघांनी केलेले भविष्यातील प्लॅन्सही शेअर करू नयेत.

हेही वाचा: Relationship Tips: तुमचा पार्टनर तुम्हाला यूज करतोय का? असे ओळखा

गिफ्ट सरप्राइज शेअर करू नका

तूमच्या जोडीदाराने तूम्हाला दिलेले सरप्राइज, गिफ्ट हे कधी कोणाला दाखवू नका. आजकाल गिफ्ट काय दिले याचे व्हिडीओ शेअर करण्याचा ट्रेंड आहे. पण, याचे दुष्परिणामही खूप आहेत. जोडीदाराने तुम्हाला कोणते गिफ्ट दिले आहे हे कोणालाही सांगू नका. यामुळे छोटे गिफ्ट असेल तर जोडीदाराची खिल्ली उडवली जाऊ शकते. त्यामुळे गिफ्ट तूमच्या आनंदापूरत मर्यादीत ठेवा.

हेही वाचा: Relationship Tips : जोडीदारासोबत अशी वाढवा 'इमोशनल इंटिमसी'

वाद चव्हाट्यावर आणू नका

नात्यातील वाद चव्हाट्यावर आणू नका. वाद मिटवण्याचा प्रयत्न करा. आणि तरीही जोडीदार ऐकत नसेल तर मग विश्वासू व्यक्तीकडून सल्ला घ्या. त्या वादावरून जोडीदाराला कमीपणा वाटेल असे वर्तन करू नका. मित्रांसमोर किंवा कुटुंबियांसमोर जोडीदारावर टीका करू नका.

हेही वाचा: Relationship tips : लैंगिक जीवन समाधानी करण्यासाठी पुरुषांनी करावीत ही कामे

प्रत्येक जोडप्यामध्ये काही सिक्रेट्स असतात. त्यांच्या नात्याबद्दल, किंवा काही भुतकाळातील गोष्टींबद्दल असू शकतील. अशा गोष्टी कधीही कोणाला सांगू नका. यामुळे तूमच्या दोघांमध्ये वादाची ठिणगी पडेल.

हेही वाचा: Relationship Tips : या ‘पाच’ चुका टाळा नाहीतर तुमचे लैंगिक जीवन उध्वस्त होईल

शेवटी हेच महत्त्वाचे की, एखादे बाळ जसे रडले, त्याने आगाऊपणा केला तरी ते तूमचे आहे म्हणून तूम्ही सांभाळून घेता. त्याला समजावता. तोच मुद्दा इथे लागू पडतो. नात्यात वाद झाले तरी नाते तूमचे आहे. तूम्हीच त्याला सुधारू आणि बिघडू शकता. त्यामुळे काय करायचे काय नाही हे सकारात्मक विचार करून करा.