Relationship Tips : जोडीदारासोबतच्या रोजच्या भांडणाला कंटाळलाय? अमेरिकन कपल थेरपी करेल मदत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Relationship Tips : जोडीदारासोबतच्या रोजच्या भांडणाला कंटाळलाय? अमेरिकन कपल थेरपी करेल मदत

Relationship Tips : जोडीदारासोबतच्या रोजच्या भांडणाला कंटाळलाय? अमेरिकन कपल थेरपी करेल मदत

पती-पत्नीचे नाते नाजूक आहे. त्यामुळे हे नाते नाजुकपणे हाताळावे लागते. भांड्याला भांडे लागते आणि या नात्याला दृष्ट लागते. घराला आणि तूमच्या रोजच्या भांडणाची सवय होते.त्यामुळे जोडीदार आणि नाते नकोसे वाटते. पण, अशाकाळात जोडप्यांना योग्य मार्गदर्शन करणे गरजेचे असते. यासाठीच कपल्स थेरपी उपयोगी पडते.

हेही वाचा: Relationship Tips : 'या' ७ औषधांनी कमी होते लैंगिक इच्छा, काय सांगतो अभ्यास?

नात्यातली ही दुरावा दूर करण्यासाठी कपल थेरपीचा वापर केला जातो. ही थेरपी करण्यासाठी कोणाच्या मदतीची गरज नाही. कपल्स स्वत: तीचा अवलंब करू शकतात. कधी कधी छोट्या छोट्या गोष्टींमुळे नात्यात अंतर वाढते. बरेच दिवस जोडपे एकमेकांशी बोलत नाहीत. अशा परिस्थितीत कपल थेरपी जोडप्यांमधील अंतर कमी करण्यासाठी काम करू शकते. पाहुयात ती कशी करायची.

हेही वाचा: Relationship Tips : या टिप्स वापरा आणि Made For Each Other म्हणून मिरवा

कपल्स थेरपी म्हणजे काय?

कपल्स थेरपी हा एक प्रकारचा मानसोपचार प्रक्रिया आहे. या प्रयोगामुळे जोडप्यांना त्यांच्या नातेसंबंधातील आव्हानांना सामोरे जाण्यास मदत करेल. या थेरपीमुळे जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होतात.

हेही वाचा: Relationship Tips: शारीरिक संबंधासाठी महिला उत्सुक आहे, हे कसं ओळखायचं?

तूम्हाला आहे का कपल थेरपीची गरज, कसे ओळखाल

जोडीदारासोबतचा संवाद वाईटपद्धतीचा होणे, नात्याचा कंटाळा येणे, रोज त्याच गोष्टीवरून पुन्हा पुन्हा भांडणे, आपले नाते सुधारण्याची इच्छा नसणे, जोडीदारापासून दूर जाण्याची इच्छा होणे.

हेही वाचा: Relationship tips : नातेसंबंधात असूनही एकटेपणा वाटतोय ? ही आहेत कारणे...

कपल थेरपीचे फायदे

जोडपे एक संघ म्हणून काम करतात, नात्यात गोडवा येतो, एकमेकांबद्दलची प्रेम आपुलकी वाढते, एकमेकांसोबतचे बॉन्डींग चांगले होते, जोडीदाराचे मत विचारावे वाटते, एकमेकांबद्दल शारीरिक आणि भावनिक बदल, एकमेकांवरचा विश्वास पुन्हा दृढ होतो, एकमेकांबद्दलचा आदर वाढतो.

हेही वाचा: Relationship tips : नातेसंबंधात असूनही एकटेपणा वाटतोय ? ही आहेत कारणे...

कशी करतात कपल थेरपी

घरचे असो वा बाहेरचे कोणतेही काम करताना एकत्र करा. एकमेकांची मदत करा. एकमेकांचे कौतूक केल्यानेही कामात प्रोत्साहन मिळते. जोडीदाराचे कौतूक करा, तसेच जोडीदारासोबत बोलाताना प्रेमाने बोलणे महत्त्वाचे आहे. जोडीदाराला आवडणाऱ्या गोष्टी करा. त्याच्यासोबत योगा, व्यायाम, डान्स करा. तीला फिरायला घेऊन जा. त्याच्यासोबत वेळ घालवा. यामुळे तूमच्या नात्यातील गोडवा कायम राहील.