esakal | Relationship Tips: अधीर मन झाले...सख्या...प्रिया; कसं ओळखाल तिच्या मनातलं?
sakal

बोलून बातमी शोधा

Relationship

जर तुमची कोणी मैत्रीण सुद्धा काही दिवस तुमच्यासोबत रोजच्या पेक्षा वेगळं वागत असेल, तर हे टिप्स फक्त तुमच्यासाठी आहे.

अधीर मन झाले...सख्या...प्रिया; कसं ओळखाल तिच्या मनातलं?

sakal_logo
By
सकाऴ वृत्तसेवा

बऱ्याचदा मुले प्रेम व्यक्त करण्याआधी त्यांच्या मनातील भाव मुलींना शेअर करताना तुम्ही पाहिले असतील. पण तुम्हाला माहितेय का, मुली त्यांच्या भावना त्यांच्या आवडत्या मुलाला सांगण्यासाठी साईन लॅंग्वेज वापरतात. हो, मुलींना प्रेमाबद्दल बोलण्यापूर्वी त्यांच्या हावभावांद्वारे त्यांचे प्रेम व्यक्त करणे जास्त आवडते. जर तुमची कोणी मैत्रीण सुद्धा काही दिवस तुमच्यासोबत रोजच्या पेक्षा वेगळं वागत असेल, तर हे टिप्स फक्त तुमच्यासाठी आहे. चला तर मग मुली प्रेम व्यक्त करण्यासाठी वापरत असलेल्या हावभाव किंवा सवयींबद्दल जाणून घेऊयात.

मुली हावभावांद्वारे करतात प्रेम व्यक्त...

- जर तुमच्या कोणत्याही मैत्रिणीला किंवा अनोळखी मुलीला अचानक तुमच्यासोबत पुन्हा पुन्हा बोलण्याचे निमित्त शोधत असेल किंवा तुम्हाला काही समस्या सोडवण्यासाठी फोन किंवा मेसेज करत असतील तर समजून घ्या की ती तुमच्या प्रेमात आहे.

- जर तुमच्या मित्राला तुमच्यासोबत एकत्र राहायचे असेल. तसेच भांडण किंवा बोलणं बंद केल्यानंतरही तुमच्या शब्दांचे पालन करायचे असेल तर याचा अर्थ असा की, ती तुमच्यावर प्रेम करत आहे.

- जर एखादी मुलगी किंवा तुमची मैत्रीण काही दिवसांसाठी तिचा लुक बदलते किंवा तुम्हाला आवडेल त्यानुसार कपडे वापरत असेल, तर ती तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतेय की ती तुमच्यावर प्रेम करत आहे.

- जर तुमची मैत्रीण किंवा तुमच्या ओळखीची मुलगी तुमच्या विनोदांना गांभीर्याने घेऊ लागली किंवा तुमच्या शब्दांमुळे पटकन चिडली तर याचा अर्थ असा की ती तुमच्या प्रेमात आहे.

- जर एखादी मुलगी किंवा तुमची मैत्रीण अचानक तुमची काळजी घेण्यास सुरुवात करते. किंवा प्रत्येक छोट्या -मोठ्या गोष्टीला आधार देऊ लागते, तर समजून घ्या की, ती तुमच्यावर प्रेम करायला सुरुवात केली आहे.

loading image
go to top