Relationship Tips : सतत होणाऱ्या भांडणांपासून कंटाळलात? जाणून घ्या वाद कसे टाळावे...

भांडण कसं टाळायंच ? जाणून घ्या
Relationship Tips
Relationship Tipssakal

माणसाच्या आयुष्यात नाते म्हटलं की वाद, मतभेद किंवा भांडण होतंच पण याचे प्रमाण सतत वाढत असेल तर ही चिंतेचे बाब आहे. नाते जपताना माणसाने समजूतदारपण वागणे अत्यंत गरजेचे आहे. कधी कधी इच्छा नसतानाही माणूस चुकून वाद किंवा भांडण करुन बसतो. तुमच्यासोबतही कधी असं झालंय का?

सतत होणाऱ्या वादांपासून किंवा भांडणांपासून तुम्ही जर कंटाळलात तर हे वाचाच. आज आम्ही तुम्हाला भांडण कसं टाळायंच याविषयी टिप्स देणार आहोत.

  •  सर्वाधिक भांडणे चुकीचं बोलण्यामुळे होतात. त्यामुळे आपण काय बोलतो, हे समजून घेणे गरजेचं आहे.

  • बऱ्याच वेळा रागाच्या भरात आपण समोरच्या व्यक्तीचं मन दुखवतो किंवा असे काही बोलून देतो जे आपल्याला बोलायचे ही नसते.

  • त्यामुळे बोलताना काळजी घेतली तर नक्कीच भांडणे कमी होतील.

Relationship Tips
Relationship मध्ये राहण्याची पार्टनरची इच्छा नाही ? कसं ओळखाल?
  • कधीही संवेदनशील विषयावर बोलताना आधी विचार करावा. काही विषय असे असतात की त्यावर चर्चा झाली की वाद हे निर्माण होतातच.

  • जर तुम्ही समोरच्याकडून कमी अपेक्षा ठेवली तर तुम्ही दुखावणार आहे आणि त्यामुळे कदाचित भांडण टाळले जाणार. 

  • आयुष्यात नाते जपताना एकाने नमते होणे गरजेचे आहे. यामुळे भांडण टाळता येतं.

  • कधी कधी वाद होत असेल तर एकाने शांत राहलेले बरे, यामुळे भांडण टाळता येतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com