Relationship Tips : सेक्स लाइफ डिस्टर्ब झालंय?; कामसूत्राच्या ‘या’ टिप्स करतील मदत!

सेक्स लाइफ हा रिलेशनशिप मधील एक महत्त्वाचा भाग आहे.
Relationship tips
Relationship tips esakal

सेक्स लाइफ हा रिलेशनशिप मधील एक महत्त्वाचा भाग आहे. लैंगिकदृष्ट्या जर जोडीदार सुखी असतील तर त्यांच्यातले प्रेम आणि त्यांचे नाते अधिक घट्ट असते. हेच सेक्स लाईफ सुखी करण्यासाठी काय करावे? केवळ शारीरिक सुखावरच भर द्यावा का? मासिक सुख या बाबतीत किती महत्त्वाचे आहे या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला कामसूत्रामध्ये सहज सापडू शकतील आणि त्याचा आपल्या आयुष्यात योग्य अबलंब केल्यास तुमचे आणि तुमच्या जोडीदाराचे आयुष्य नक्कीच सुखी होऊ शकते. 

Relationship tips
Recipe: घरच्या घरी सीताफळ रबडी कशी तयार करायची ?

कामसूत्राचे नाव येताच लाज, काहीशी संकोचाची भावना निर्माण होते.  त्यामुळे त्यावर मोकळेपणाने बोलणे होत नाही. या गोष्टी आता आपण मानत असलो करी त्यावरील मोकळेपणा वात्सायन यांनी लिहीलेल्या ‘कामसूत्र’या पुस्तकात दिसून येतो. सेस्कच्या बाबतीत आनंदी आणि समाधानी जीवन कसे जगायचे ते हे पुस्तक सांगते. तूमची सेक्स लाइफही डिस्टर्ब झाली असेल तर या काही टिप्स तूमच्या उपयोगी पडतील.

Relationship tips
Diwali Festival : दिवाळीच्या रात्री का खेळले जातात पत्ते? जाणून घ्या रंजक किस्सा

फोरप्ले महत्त्वाचा 

सेक्स करताना तुम्ही हे लक्षात ठेवा की, तुम्ही दोघेही सेक्ससाठी तयार आहात का?. तुम्ही पार्टनरवर कोणत्याही प्रकारे जबरदस्ती करू नये.  कामसूत्रात दिलेल्या माहितीनुसार, सेक्स करण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या पार्टनरला उत्तेजित करावे. ज्यामुळे सेक्सचा आनंद दोघांनाही घेता येईल. फोरप्लेसाठी तुम्ही तुमच्या जोडीदाराला मिठी मारा. तिला प्रेमाने स्पर्श करा. तीला आवडतं ते करा. 

Relationship tips
Diwali Recipe: दिवाळी स्पेशल पारंपरिक पद्धतीने चंपाकळी कशी तयार करायची?

जास्त वेळ किस करणे.

सेक्स करताना किस करणे हे परमोच्च आनंदाकडे नेणारी गोष्ट आहे. कारण ओठांचा स्पर्श तुम्हाला अती उत्तेजीत करतो. किस करताना घाई करू नका. त्यासाठी वेळ द्या. अतीवेळ किस केल्याने पुरुष जोडीदार खूप लवकर उत्तेजित होतो. आणि सेक्स करण्यासाठी घाई करतो. तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या संपूर्ण शरीरावर किस करू शकता. 

Relationship tips
Relationship Tips: तुम्हालाही सुखी जोडप होयचयं, मग फॉलो करा या सवयी

ऑर्गेज्म मिळवणे.

कामसूत्रात दिलेल्या माहीतीनूसार सेक्स करताना महिलांना अनेक ऑर्गेज्म होऊ शकतात. त्यामुळे त्या ऑर्गेज्म मिळाल्यानंतरही सेक्स करू शकतात. पण जर पुरुषाचे विर्य फलन झाले तर त्याची एनर्जी लेव्हल खाली जाते. त्यामुळे तो जास्तवेळ सेक्स करू शकत नाही. त्यामुळे अशा स्थितीत पुरुष जोडीदाराने आधी त्याच्या जोडीदाराला ऑर्गेज्मपर्यंत पोहोचवणे आणि नंतर स्वत:चे ऑर्गेज्म मिळवणे आवश्यक आहे.

स्त्रीयांनीही पुढाकार घ्यावा.

सेक्स ही दोघांनाही आनंद देणारी गोष्ट आहे. त्यामुळे प्रत्येकवेळी पुरूषांनीच पुढाकार घेतला पाहिजे असे नाही. कधी कधी स्त्रीयांनीही सेक्स करताना जोडीदाराला उत्तेजित केले पाहिजे. असे केल्याने जोडीदार इंप्रेस होईल. हे करण्यासाठी तुम्ही तुमचे नखे आणि आवाजाचा वापर करू शकता. सेक्सचा अधिक आनंद घेण्यासाठी तुम्ही बेडरूममध्ये मंद लाईट ठेऊ शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com