Husband Bad Habbits
Husband Bad Habbitsesakal

Husband Bad Habbits: बायकोला अजिबात आवडत नाही नवऱ्याच्या 'या' गोष्टी, या सवयी तुम्हाला तर नाही ना?

बायकोपुढे असे काही बोलू नका की नात्यात येईल दुरावा
Published on

Relationship Tips: प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव हा वेगळा असतो. आणि त्यानुसाार त्याच्या सवयीसुद्धा. नवरा बायकोमध्ये कधी कधी तुमच्या याच चांगल्या वाईट सवयींमुळे वाद होऊ शकतात. तेव्हा बायकोला नवऱ्याच्या न आवडणाऱ्या काही सवयी जाणून घ्या. असे केल्यास तुम्हाला चुकून या सवयी तर नाही ना हेही तुम्हाला सहज कळेल. चला तर जाणून घेऊया नवऱ्याच्याया या वाईट सवयी ज्या बायकांना अजिबात आवडत नाही.

१) पत्नीला गमतीतही या गोष्टी बोलू नका

प्रत्येकजण हा परफेक्ट असेलच असं नाही. तुमच्या पत्नीला एखादी काम नसेल येत तर तिला वेगळ्या पद्धतीने समजवा. मात्र गमतीत नेहमी तिची चेष्टा करू नका. यामुळे तुमच्या नात्यात दुरावा येऊ शकतो.

२) दुसऱ्या महिलांची स्तुती

प्रत्येक महिलेत चांगले वाईट गुण असतात. मात्र तुमच्या पत्नीपुढे दुसऱ्या महिलेची स्तुती करू नका. असे केल्याने तुम्ही तिचं मन दुखावता. तुमच्यात या सवयींमुळेही भांडणं होऊ शकतात. म्हणूनच तुमच्या पत्नीपुढे दुसऱ्या महिलेची स्तुती करू नका. (Relationship Tips)

३) पत्नीच्या घरच्यांविषयी बोलणे

तुमच्या पत्नीच्या घरच्यांविषयी चुकूनही वाईट साईट बोलू नका. त्याने तिला भयंकर राग येऊ शकतो. गमतीत देखील तुम्ही काही बोलल्यास तिला राग येऊ शकतो. तेव्ही ही सवयही तुम्ही आजच मोडा.

Husband Bad Habbits
Relationship Tips: शारीरिक संबंधासाठी महिला उत्सुक आहे, हे कसं ओळखायचं?

डिस्क्लेमर: हे घरघुती उपाय सामान्य माहितीच्या आधारावर दिल्या गेले आहेत. याचा सकाळ वृत्तसमुहाशी संबंध नसून संबंधित विषयाच्या अधिक माहितीसाठी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com