'अरेंज मॅरेज'मध्ये मुलींना हमखास 'हे' प्रश्न विचारतात; त्याचं मनापासून उत्तर द्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Arranged Marriage

काही मुली पालकांच्या दबावाखाली येऊन त्या लग्नानंतर नोकरी सोडतील, असं सांगतात. आणि नंतर आयुष्यभर...

'अरेंज मॅरेज'मध्ये मुलींना हमखास 'हे' प्रश्न विचारतात

sakal_logo
By
बाळकृष्ण मधाळे

असं म्हटलं जातं, की पहिलं इंप्रेशन हेच लास्ट इंप्रेशन असतं. प्रत्येक मुलासाठी आणि मुलीसाठी पहिल्यांदाच स्वतःसाठी जोडीदार निवडताना, असंच काहीसं घडतं. लग्नासाठी जोडीदार निवडताना अनेक प्रकारचे प्रश्न जोडप्यांच्या मनात येत असतात. बहुतेक मुलं त्यांच्या भावी जोडीदाराला अरेंज मॅरेज करण्यापूर्वी काही प्रश्न देखील विचारतात. जाणून घेऊ कोणते ते प्रश्न..

लग्नानंतर नोकरी करण्याचा विचार आहे? : अरेंज मॅरेज करणारी मुलं मुलीला पसंत करण्यापूर्वी हा प्रश्न अनेकदा विचारतात. काही मुली पालकांच्या दबावाखाली येऊन त्या लग्नानंतर नोकरी सोडतील, असं सांगतात. आणि नंतर आयुष्यभर त्या स्वतः ला दोष देत राहतात. म्हणूनच, जर एखाद्या मुलाने तुम्हाला हा प्रश्न विचारला, तर या प्रश्नाचं उत्तर तुमच्या स्वप्नांशी तडजोड करून नाही, तर काळजीपूर्वक विचार करून द्या.

कुटुंब नियोजनाचं काय? : मुलाच्या कुटुंबातील सदस्यांनी लग्नापूर्वी हा प्रश्न विचारल्याचे अनेकदा दिसून आलेय. लग्नानंतर उशीरा आपत्य जन्माला घालणं आणि त्यानंतर खऱ्या आयुष्याला सुरुवात करणं, हे करत असतानाच आपलं करिअर सांभाळणं, असं नियोजन कुटुंबाचा एक भाग म्हणून केलं जातं. लग्नाआधी कोणतेही कपल्स सांगू शकत नाही, की त्यांचा भावी जोडीदार कसा असेल अथवा त्याच्याबरोबर त्यांचे भविष्य काय असेल, त्यामुळे या प्रश्नाला आपण समर्पक उत्तर द्या.

हेही वाचा: तुमच्या 'या' चार सवयी गर्लफ्रेंडला ठरु शकतात त्रासदायक

लग्नापूर्वी वजन कमी करशील? : जर मुलगी थोडी लठ्ठ किंवा सडपातळ असेल आणि मुलाच्या कुटुंबातील सदस्यांना ती आवडली असेल, तर अनेक वेळा मुलं मुलीला प्रश्न विचारतात की, ती लग्नापूर्वी तिचे काही वजन वाढवेल की कमी करेल? असे प्रश्न मुलीचा आत्मविश्वास कमी करू शकतात. अशा प्रसंगी मुलीने या प्रश्नाचे उत्तर देताना तिच्या मनाचे ऐकावे.

या गोष्टी लक्षात ठेवा : पहिल्या भेटीत मुलीशी बोलताना मुलांनी तिचे जुने नाते किंवा कठोर प्रश्न विचारणे टाळावे. या बैठकीत तुम्ही मुलीच्या आणि तिच्या कुटुंबाच्या आवडी-निवडीबद्दल बोलू शकता. हे आपल्याला एक कल्पना देईल, की आपण त्याच घरात त्यांच्याशी जुळवून घेऊ शकाल की नाही. त्यामुळे या गोष्टींचं देखील भान ठेवणं गरजेचं आहे.

आधी एकमेकांना समजून घ्या : लग्नाचा विषय येताच, लोक त्यांच्या भविष्याचा आणि बचतीचा विचार करू लागतात. पण, मुलीला तिच्या पगाराबद्दल थेट विचारू नका. याचा अर्थ, मुलीशी पहिल्याच भेटीत पैशाबद्दल बोलू नका. तुम्ही आधी एकमेकांचं व्यक्तिमत्त्व आणि स्वभाव समजून घ्या हे चांगलं राहिलं.

loading image
go to top