Relationship Tips : ही पाच कारणे टाळा! संसार सुखाचा करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Relationship Tips
Relationship Tips : नवीन लग्न झाल्यावर नवरा- बायकोचं भांडण होण्याची ५ कारणं

Relationship Tips : ही पाच कारणे टाळा! संसार सुखाचा करा

लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातला अत्यंत मोठा निर्णय असतो. लग्न ठरल्यावर दोघं एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करतात. पण, झाल्यावर नवरा बायको एकमेकांबरोबर नेहमीपेक्षा जास्त वेळ घालवणार असतात. त्यामुळे एकमेकांची स्पेस, खोली अगदी सगळंच शेअर होणार असतं. स्वभावही वेगळे असल्याने सुरूवातीच्या काळात एडजस्ट करणं थोडं कठीण असलं तरी दोघं एकमेकांना समजून घेत पुढे जातात. पण नवीन लग्न झाल्यावर नवरा बायकोत या पाच कारणांमुळे वाद होऊ शकतात.

हेही वाचा: लग्नानंतर अनेक वर्षांनी नवरा-बायको विभक्त का होतात? जाणून घ्या कारणे

Couple

Couple

ओला टॉवेल बेडवर टाकणे - नवरा बायकोत भांडणांचं कॉमन कारण म्हणजे ओला टॉवेल तसाच बेडवर टाकणे. ओला टॉवेल इथे कोणी टाकला यामुळे तसा काही फरक पडत नाही, पण लग्नाच्या सुरुवातीच्या काळात नवरा-बायकोच्या भांडणाचं कारण किती गोड असू शकतं, हे यावरून समजंत.

चहावरून वाद- सासू आणि नवऱ्याबरोबर एडजस्ट करण्याचा मुलगी खूप प्रयत्न करते. पण काहीना काही गोष्टी सर्वांनाच खटकत असतात. मुलाला आईच्या हातच्या चहाची सवय असते. पण बायकोचा चहा आईसारखा लागत नाही म्हटल्यावर ती साहजिकच चिडते. यावरून दोघांत वाद होतात. तुलना केल्याने बायकोला वाईट वाटते. त्यामुळे आई आणि बायकोला सांभाळणं नवऱ्याला कधीकधी कठीण जातं. पण हे दिवस फार मजेचे असतात.

हेही वाचा: नवरा-बायकोमधील किरकोळ वादाला गांभीर्यानं घेऊ नका; होऊ शकतात पाच फायदे

couple arguments

couple arguments

मित्रांबरोबर वेळ घालवणे- अनेक पुरूषांना मित्रांबरोबर वेळ घालवणे आवडते. ते बायकोपेक्षा मित्रांना अधिक वेळ देतात. जर तुम्ही असे सतत मित्रांबरोबर वेळ घालवत असाल तर मात्र आधीच सावध व्हा. कारण नवीन लग्न झालेल्या जोडप्यात बायकोला वेळ देणे गरजेचे असते. तसे तुम्ही देत नसाल तर बायको साहजिक चिडेल. अशावेळी तीला कसे मनवायचे, तिला सोबत न्यायचे का या गोष्टी नवऱ्यावर अवलंबून असतात.

आई-वडिलांशी न पटणे- सुरूवातीला मुलीला सासरच्या लोकांशी एडजस्ट करणे कठीण जाते. मुलीला आपल्या आई वडिलांची जास्त सवय असते. अशावेळी तिला समजून घेणे गरेजेच असते. त्यामुळे सुरूवीतीच्या काळात पद्धतीवरून खटके उडू शकतात. पण एकमेकांबरोबर पटण्यासाठी सगळ्यांनीच एकमेकांना थोडा वेळ देणे गरजेचे असते.

बॅचलर असल्यासारखे राहणे- लग्नानंतर पुरूषांना बायकोबरोबर एडजस्ट व्हायला वेळ लागू शकतो. लग्न झाल्यानंतरही काही मुलं बॅचलर लाईफ जगायचा प्रयत्न करतात. पार्टी करणे, मुलींबरोबर फ्लर्ट चालू असते. अशावेळी बायकोला असुरक्षित वाटू शकते. त्यामुळे असं न करता बायकोला अधिक वेळ देऊन तिला समजून घेण्याचा प्रयत्न करा.

हेही वाचा: बायको म्हणे, नवऱ्यानं केलेली मारहाण योग्यच; संशोधनाचा निष्कर्ष

Web Title: Relationship Tips Those 5 Hilarious Things Which Made A Fight Between Couples

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :RelationsTipsmarried life