
प्रेमाच्या जशा गोड आठवणी असतात तशाच काही कटू आठवणीही असतात. त्यामुळे अनेकांना प्रेमाच्या वेगवेगळ्या छटांच्या आठवणींमध्ये रममाण व्हायला आवडतं. परंतु, बऱ्याचदा ब्रेकअप झाल्यानंतर प्रेमाच्या गोड आठवणींऐवजी काही जण कटू आठवणींमध्येच जास्त काळ रमतात. त्यामुळे काही वेळा नैराश्यदेखील येऊ शकतं. सतत प्रेमात झालेली फसवणूक, मिळालेली वागणूक यामुळे व्यक्तीचा आत्मविश्वास कमी होतो. इतकंच नाही तर कितीही प्रयत्न केला तरीदेखील या आठवणी सहजासहजी विसरणं अनेकांना शक्य होत नाही. म्हणूनच, ब्रेकअपनंतर प्रेमाच्या कटू आठवणी कशा विसरायच्या ते पाहुयात (relationship tips what can you do when you want to forget the memories of love)
१. जीवनशैलीत बदल करा -
ब्रेकअप झाल्यानंतर अनेक जण नैराश्यात जातात.मात्र, या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी जीवनशैलीत काही मुलभूत बदल करणं अत्यंत गरजेचं आहे. मनावरील ताण व मरगळ दूर करण्यासाठी नियमितपणे ध्यान व योग करा. ज्यामुळे पॉझिटिव्हीटी निर्माण होऊ शकते. ध्यान व योग करण्यासोबतच मित्रमंडळींना भेटणे, फिरायला जाणे, कुटुंबियांसोबत वेळ घालवणे असं लहान लहान बदलदेखील करा.
२. नव्या सवयी लावा -
ब्रेकअप झाल्यावर अनेक जणांचं कोणत्याचं कामात मन लागत नाही. अनेकदा अशा व्यक्ती कायम आपल्याच विचारात गर्क राहतात. परंतु, या विचारांमधून बाहेर येणं अत्यंत गरजेचं आहे. जर सतत जुन्या आठवणींमध्ये रमल्यामुळे येणाऱ्या भविष्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे नव्या सवयी लावा ज्यामुळे तुमचं लक्ष दुसरीकडे वेधलं जाईल. व, नव्या कामामुळे जुन्या गोष्टींचा विसर पडेल. यासाठी विविध छंद जोपासा, गाणी ऐका, व्यायाम करा असे लहान लहान बदल करा.
३. सिंगल असण्याचा आनंद घ्या -
एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यातून निघून गेली म्हणजे आपल्या जीवनाचा अंत झाला अशी काहीशी फिलिंग अनेकांना जाणवते. मात्र, असा नकारात्मक विचार करण्याऐवजी सिंगल असण्याचा आनंद घ्या. मित्रमंडळी, कुटुंबियांना वेळ द्या. अनेकदा रिलेशनशीपमध्ये असताना कुटुंबिय किंवा मित्रपरिवाराला वेळ द्यायला जमत नाही. परंतु,ब्रेकअपनंतर तुम्ही प्रत्येकाला स्वतंत्र वेळ देऊ शकता. त्यामुळे या काळात नवनवीन मित्र-मैत्रिणी बनवा, फिरायला जा आणि सर्वात महत्त्वाचं स्वत:ला वेळ द्या.
४. नव्या ठिकाणी फिरायला जा -
बऱ्याचदा ब्रेकअप झाल्यावर कोणत्याच गोष्टीमध्ये फारसं मन लागत नाही. परंतु, तुमचा हाच स्वभाव तुमच्या यशाच्या आड येऊ शकतो. त्यामुळे मनावरील मरगळ, दु:ख विसरा आणि नवनव्या ठिकाणी भेट द्या. नव्या ठिकाणी, नव्या लोकांना भेटल्यावर सकारात्मक विचार व दृष्टीकोन वाढीस लागण्यास मदत होते. त्यामुळे नव्या ठिकाणी फिरायला जा, ज्यामुळे तुमचा मूड चेंज होऊन जुन्या आठवणी विसरणं शक्य होईल.
५. मित्रांसोबत संवाद साधा -
मित्रपरिवारासोबत काही वेळ घालवा. ज्यामुळे मनावरील ताण व दु:ख काही अंशी कमी होण्यास मदत मिळेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.