esakal | झोपण्यापूर्वी करा मेकअप Remove; अन्यथा असे होऊ शकते नुकसान
sakal

बोलून बातमी शोधा

झोपण्यापूर्वी करा मेकअप Remove; अन्यथा असे होऊ शकते नुकसान

झोपण्यापूर्वी करा मेकअप Remove; अन्यथा असे होऊ शकते नुकसान

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

आपण सुंदर दिसावे म्हणून चेहऱ्यासाठी अनेक सौंदर्य प्रसाधनांचा सर्वाधिक वापर केला जातो. धूळ, धूर आणि प्रदूषणाचा सर्वात जास्त परीणाम हा चेहऱ्यावर होतो. यासाठी कॉस्मेटिक नक्कीच फायदेशीर ठरतात. पण कॉस्मेटिक लावल्यानंतर जर ती योग्यरित्या काढली गेली नाही तर ती नुकसानदायक ही ठरू शकतात. जसे मेकअप लागू करणे ही एक प्रक्रिया आहे, त्याचप्रमाणे मेकअप योग्य वेळी काढणे ही देखील योग्य प्रक्रिया आहे. विशेषत: रात्री झोपण्यापूर्वी मेकअप काढणे खूप महत्वाचे आहे. असे न केल्यास स्किन डॅमेज होऊ शकते. म्हणून काही सोप्या टिप्स देणार आहोत ज्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल.

रात्रीची चांगली झोप शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर आहे. पूर्वीपासून अस सांगण्यात आले आहे की, रात्री झोपताना नेहमी हात-पाय धुऊन झोपावे. आरोग्यास चांगले असते. कोरोनाने हे दाखवून ही दिेले आहे. तसेच चेहऱ्यासाठी ते महत्वाचे आहे. मेकअप जर तसाच ठेऊन झोपलो तर याचा परिणाम मुरुम, सुरकुत्या, त्वचेवर डागांच्या स्वरूपात येतो. म्हणूनच मेकअप काढणे आवश्यक आहे.

हेही वाचा: वाढलेलं वजन कमी करायचंय? भिजवलेले शेंगदाणे खा, जाणून घ्या फायदे

मेकअप काढण्यासाठी काही महत्वाच्या गोष्टी

कॉटन बॉल्स किंवा साधे पण स्वच्छ क्लींजिंग ऑयल किंवा बेबी ऑइलमध्ये बुडवून हलक्या हाताने चेहरा स्वच्छ करा. लक्षात ठेवा हे करत असताना तेल किंवा मेकअप डोळ्यात जाऊ नये याची काळजी घ्या. आयशॅडो, मस्करा आणि लाइनर काढताना विशेष काळजी घ्या. बाजारात विशेषतः डोळ्यांचा मेकअप काढण्यासाठी काही मेकअप रिमूव्हर्स उपलब्ध आहेत. याचा ही पर्याय निवडू शकता.

मेकअप रिमूव्हर लावल्यानंतर त्याला लगेच काढू नका. काही वेळासाठी ते त्वचेवर सेट होऊ द्या. नंतर काढून टाका.तेलाचा वापर देखील करू शकता. यामुळे स्किनला मॉइश्चर देखील मिळू शकते.

मेकअप रिमूव्हर वाइप्स आजकाल बाजारात सहज उपलब्ध आहेत. याचा वापर करून, तुम्ही संपूर्ण मेकअप एकाच वेळी काढू शकता. बेस्ट रिजल्टसाठी अल्कोहोल मुक्त वाइप्स निवडा जेणेकरून मेकअप काढल्यानंतर त्वचा कोरडी होणार नाही.

मेकअप काढल्यानंतर टोनर वापरण्यास विसरू नका. टोनर केवळ त्वचेवर उरलेला मेकअप काढून टाकत नाही तर त्वचेला चमक दखील देतात. बाजारात टोनर्स देखील उपलब्ध आहेत, जे त्वचेला जीवनसत्त्वांसारखे पोषण देऊ शकतात.

लिपस्टिक लावल्यानंतर थोड्या काळानंतर कमी होऊ लागते परंतु ती पूर्णपणे काढून टाकणे देखील आवश्यक आहे. नाहीतर ओठांची त्वचा खराब होण्यास सुरवात होते. जर तुम्हाला क्लीन्झर वापरायचा नसेल तर तुम्ही क्रीमचा हलका थर लावून ओठांचा रंग स्वच्छ करू शकता. हे रंग काढून टाकल्यानंतरही ओठ पुरेसे ओलसर ठेवेल.

हेवी मेकअपसाठी क्लींझर व्यतिरिक्त, माइल्ड फेस वॉश किंवा साबण देखील वापरला जाऊ शकतो. मेकअप काढताना कानाच्या मागील भाग देखील स्वच्छ करा. इथेच तुमचा मेकअप बेस अनेकदा राहतो. याचा परीणाम त्वचेला तसेच केसांना होऊ शकतो. मेकअप काढल्यानंतर आपला चेहरा धुण्यास आणि मॉइश्चरायझर लावायला विसरू नका.

loading image
go to top