
Republic Day 2025: दरवर्षी आपण सगळे भारतीय २६ जानेवारी खूप उत्साहात साजरा करतो. या दिवशी, राजधानी दिल्लीच्या कर्तव्य पथावर एक भव्य परेड आयोजित केली जाते, ज्यामध्ये देशाची सशस्त्र सेना, सांस्कृतिक झलक आणि शाळकरी मुलांची तुकडी सहभागी होते.
याच दिवशी, २६ जानेवारी १९५० साली संविधान लागू केले गेले होते. मसुदा समितीने केलेल्या अथक प्रयत्नांनंतर तयार केले गेलेले हे संविधान भारताला सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही प्रजासत्ताक म्हणून घोषित करते. प्रजासत्ताक दिन आपल्याला आपल्या हक्कांची आणि कर्तव्यांची जाणीव करून देतो आणि आपले देशावरील प्रेम अधिक दृढ करतो.