Republic Day Weekend : प्रजासत्ताक दिनाच्या सुट्टीत कुटुंबासोबत भारतातील या ऐतिहासिक स्थळांना भेट द्याच!

तुम्ही प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतातील या ऐतिहासिक ठिकाणांना भेट देऊ शकता.
Republic Day Weekend : प्रजासत्ताक दिनाच्या सुट्टीत कुटुंबासोबत भारतातील या ऐतिहासिक स्थळांना भेट द्याच!

यावर्षी भारत आपला 75 वा प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी 2024 रोजी साजरा करणार आहे. या दिवशी संपूर्ण भारतात सार्वजनिक सुट्टी असते. दरवर्षी २६ जानेवारीला दिल्लीच्या 'कर्तव्यपथ'वर विशेष कार्यक्रम आयोजित केला जातो. २६ जानेवारी हा प्रत्येक भारतीयासाठी खूप खास दिवस आहे.

यावर्षी २६ जानेवारी शुक्रवारी आहे. अशा स्थितीत शुक्रवार, शनिवार आणि रविवार असा लाँग वीकेंड येणार आहे. लाँग विकेंडला तुम्ही भारतातील या ऐतिहासिक ठिकाणांना भेट देऊ शकता.

दिल्ली

प्रजासत्ताक दिनाचा भव्य सोहळा पाहायचा असेल तर तुम्ही दिल्लीला जाऊ शकता. दिल्लीत प्रजासत्ताक दिन मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. या दिवशी कर्तव्यपथवर औपचारिक परेड होतात. ही परेड राष्ट्रपती भवनाच्या गेटपासून सुरू होते, कर्तव्य पथ ओलांडून इंडिया गेटपर्यंत पोहोचते. परेड भारताची संरक्षण क्षमता, सांस्कृतिक आणि सामाजिक वारसा दर्शवते.

Republic Day Weekend : प्रजासत्ताक दिनाच्या सुट्टीत कुटुंबासोबत भारतातील या ऐतिहासिक स्थळांना भेट द्याच!
Trekking in Jammu-Kashmir : ट्रेकिंगला जायचा विचार करताय? जम्मू-काश्मीरमधील हे ठिकाण आहे बेस्ट

जालियनवाला बाग

२६ जानेवारीला तुम्ही जालियनवाला बागलाही भेट देऊ शकता. जालियनवाला बाग अमृतसर, पंजाब येथे स्थित आहे. येथे तुम्ही वाघा-अटारी बॉर्डर देखील पाहू शकता. परेड व्यतिरिक्त येथे रिट्रीट सोहळा देखील पाहता येतो.

साबरमती आश्रम (गुजरात)

अहमदाबाद येथे स्थित साबरमती आश्रम, स्वातंत्र्य चळवळीदरम्यान महात्मा गांधींच्या जीवनाची झलक देते. प्रजासत्ताक दिनानिमित्त येथे अनेक प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. तुम्ही येथे ध्वजारोहण समारंभातही सहभागी होऊ शकता.

कारगिल वॉर मेमोरियल

प्रजासत्ताक दिनानिमित्त तुम्ही लडाखमध्ये असलेल्या कारगिल वॉर मेमोरियललाही भेट देऊ शकता. 1999 मध्ये कारगिल युद्धात भारतीय लष्कराने पाकिस्तानचा पराभव केला होता. या युद्धात शहीद झालेल्या भारताच्या शूर सुपुत्रांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कारगिल युद्ध स्मारक बांधण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com