Roasted Mango Benefits
Roasted Mango Benefitsesakal

Roasted Mango Benefits : फ्राय केलेल्या आंब्याचा ज्यूस अनेक गोष्टींसाठी फायदेशीर? एकदा वाचाच!

भाजलेला आंबा खाण्याचे अनेक फायदे

Roasted Mango Benefits : आमरस, आंबा पोळी, बर्फी, आंबा फालुदा, आंबा सॅलेड असेल आंब्याचे अनेक पदार्थ आपण खातो. त्यात पिवळाधमक आंबा कधी चोकून तर कधी कापून खाण्याचे सुख दुसऱ्या कशातच नाही. पण, तुम्ही कधी भाजलेल्या आंब्याबद्दल ऐकलं आहे का? नाही ना मग आता आम्ही काय सांगतोय ते नीट लक्ष द्या.

भाजलेला आंबा आपल्या आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. खरं तर हा हंगाम आंब्याचा आहे आणि यामध्ये तुम्ही कच्च्या किंवा पिकलेल्या कोणत्याही प्रकारे आंब्याचे सेवन करू शकता.

आंब्यामध्ये व्हिटॅमिन सी, फायबर आणि काही मायक्रोन्यूट्रिएंट्स असतात. जे शरीरासाठी अनेक प्रकारे काम करतात. दुसरे म्हणजे, यात अँटीबॅक्टेरियल गुणधर्म देखील आहेत जे पोटासाठी बऱ्याच प्रकारे कार्य करू शकतात. कसे, जाणून घेऊया याबद्दल.

Roasted Mango Benefits
Raw Mango Kadhi: जेवणात बनवा कैऱी ची कढी, चव चाखून मन होईल तृप्त

भाजलेला आंबा खाण्याचे फायदे

उष्माघातापासून संरक्षण करते

आंबा भाजल्याने उष्माघातापासून बचाव होण्यास मदत होते. खरं तर या पद्धतीमुळे शरीरातील तापमान संतुलित राहतं आणि मग गरम वाऱ्यांशी लढण्यास मदत होते. याशिवाय हे शरीरातील हायड्रेशन वाढविण्यात देखील उपयुक्त आहे जेणेकरून आपण ही समस्या टाळू शकाल.

कोरफड आणि सेलेरीचे हे कॉम्बिनेशन युरिक अॅसिडच्या रुग्णांसाठी प्रभावी, सेवनाने मिळणार अधिक फायदे

पोटातील संक्रमण कमी करते

पोटातील संसर्ग रोखण्यासाठी आंबा खूप प्रभावीपणे कार्य करू शकतो. खरं तर, जेव्हा आपण आंबा भाजता तेव्हा त्याचे अँटीबॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म पोटाच्या संसर्गाशी लढा देतात. याशिवाय हे पीएच संतुलित करते आणि पोटाच्या अनेक समस्या टाळण्यास उपयुक्त आहे.

Roasted Mango Benefits
Roasted Mango Benefitsesakal
Roasted Mango Benefits
आंब्यापासून तयार करा Mango chia milk, एक टेस्टी आणि हेल्दी पर्याय

गॅस आणि अपचनावर प्रभावी

गॅस आणि अपचनात आंबे शिजवणे फायदेशीर ठरते. खरं तर आंबा शिजवून त्याचे सेवन केल्यास सूज येण्याची समस्या उद्भवत नाही. याशिवाय गॅसची समस्या कमी करण्यासाठीही ही पद्धत उपयुक्त ठरते.

भाजलेल्या आंब्याच्या रसाचे फायदे

आंबा भाजून तुम्ही त्याचे सरबत बनवू शकता.

यासाठी तुम्ही कच्चा किंवा शिजवलेला आंबा निवडू शकता.

फक्त आंबा भाजून त्याचा लगदा काढावा लागतो.

नंतर त्यात थोडी भाजलेली हिंग आणि अजवाइन बारीक करून मिक्स करा.

आता त्यात गूळ फोडून मिक्स करा. नंतर त्यात पाणी घालून ते सर्व मिसळून सेवन करावे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com