बुलेटप्रेमींची धडधड वाढली; Royal Enfield ने वाढवल्या किंमती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Royal Enfield

बुलेटप्रेमींची धडधड वाढली; Royal Enfield ने वाढवल्या किंमती

नवी दिल्ली : भारतात रॉयल एनफिल्ड या गाडीचे म्हणजेच बुलेटचे खूप चाहते आहेत. रॉयल एनफिल्ड आपल्या गाड्यांच्या मॉडेलमध्ये सारखे बदल करत असते तर नवीन मॉडेल बाजारात विक्रीसाठी आणत असते. पण बुलेट प्रेमींसाठी आता मोठी बातमी आहे. 350 सीसी इंजिन असलेल्या गाड्यांच्या किंमती कंपनीने वाढवल्या आहेत.

(Royal Enfield Bullet 350 Prices May 2022)

नव्या 350 सीसी बुलेटसाठी आता आपल्याला 1 लाख 48 हजार रुपये मोजावे लागणार आहेत. तर किकस्टार्ट गाडीसाठी आपल्याला 1 लाख 54 हजार 674 रुपये मोजावे लागणार आहेत. तर इलेक्ट्रिक स्टार्ट गाडीसाठी आपल्याला 1 लाख 63 हजार 338 रुपये द्यावे लागणार आहेत. दरम्यान या किंमती दिल्लीतील शोरुमने दिलेल्या आहेत. या किंमती भारताच्या विविध भागांमध्ये वेगवेगळ्या असू शकतात. त्यानंतर या वाढलेल्या किंमतीशिवाय कंपनीने दुसरी माहिती दिलेली नाही.

हेही वाचा: मनसे नेते पोलिस आयुक्तांच्या भेटीला; वसंत मोरेंचं 'एकला चलो रे'

नवी किंमत असलेल्या गाडीच्या इंजिनबद्दल बोलायचे झाल्यास, याला 346cc एअर-कूल्ड FI इंजिन देण्यात आले आहे, जे 5,250 rpm वर 19.1 bhp ची कमाल पॉवर आणि 4,000 rpm वर 28 Nm पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. यामध्ये 5-स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे.

हेही वाचा: लग्नपत्रिका द्यायला गेली होती; अपहरण करून केला महिनाभर बलात्कार

रॉयल एनफिल्डच्या 350cc गाडी ही विक्रीच्या बाबतीत सहसा दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकावर असते, तर क्लासिक 350 ही आघाडीवर असते. न्यु जनरेशन बुलेट ही भारतातील सर्वांत प्रतिष्ठित गाडी म्हणून ओळखली जाते. ही गाडी डोंगरभागात आणि दगडांच्या रस्त्यावरसुद्धा सक्षमपणे चालू शकते म्हणून देशातील तरुणांना तीच्याबद्दल विशेष आकर्षण आहे.

Web Title: Royal Enfield Bullet 350 Prices May 2022

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :lifestyle
go to top