
मनसे नेते पोलिस आयुक्तांच्या भेटीला; वसंत मोरेंचं 'एकला चलो रे'
पुणे : पुण्यात आज मनसेच्या शिष्टमंडळाने पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची भेट घेतली आहे. सध्या राज्यात भोंग्याच्या प्रकरणावरुन तापलेल्या विषयावर भेट घेतली असल्याचं बोललं जातंय. यावेळी पुण्यातील मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते पण नगरसेवक वसंत मोरे उशिरा पोहोचल्याचं पाहायला मिळालं.
शहराध्यक्ष साईनाथ बाबर यासह बाबू वागस्कर, बाळा शेडगे, गणेश सातपुते हे यावेळी उपस्थित होते. राज ठाकरे यांच्या आदेशानुसार ही भेट घेतल्याचे मनसे पदाधिकाऱ्यांनी सांगितलं. मुंबई पोलिसांनी भोंग्याच्या आवाजाच्या पातळीबाबत जे पत्रक काढले आहे तसे पत्रक पुणे पोलिसांनी काढावे अशी मागणी यावेळी करण्यात आलेली आहे. मुंबई पोलिसांनी काढलेल्या पत्रकात आवाजासंदर्भात नियमावली जाहीर केलेल्या आहेत.
हेही वाचा: मुंबईत योगी सरकारचं कार्यालय; राज ठाकरेंच्या भूमिकेचे पडसाद?
त्याबाबत आम्हाला लोकांचे फोन येत असून जर याबाबत पोलिसांनी माहिती नाही दिली तर आम्ही पक्ष म्हणून निर्णय घेऊ असं त्यांनी सांगितलं. नंतर पुढील दहा दिवसात पुणे पोलिस आम्हाला याबाबत माहिती देतो असं म्हटले आहेत. त्यांच्या निर्णयानंतर आम्ही पुढील भूमिका जाहीर करू असं मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी माध्यमांना बोलताना म्हटलं आहे.
हेही वाचा: ...स्कॅन नव्हे हा तर MRI स्कॅम; शिवसेना आमदार मनिषा कायंदे
यासंदर्भातील आधीच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला ते उपस्थित होते, आमच्यात काही मतभेद नाहीत असं त्यांनी सांगितलं. राज ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्याबद्दल विचारले असता ते म्हणाले की, या विषयावर ज्या लोकांना बोलायला लावले आहे तेच लोकं बोलतील असं म्हणत त्यांनी आयोध्या दौऱ्याबद्दल बोलणं टाळलं आहे.
याबद्दल वसंत मोरे हे आयुक्तांच्या भेटीला उशीरा पोहोचले होते. ते पुढे बोलताना म्हणाले की, राज ठाकरे आले तरच मी शहर कार्यालयात जाईल तसंच एकला चलो रे असलो तरी पक्षातच आहे आणि राजमार्गावर आहे असं त्यांनी म्हटलं आहे.
Web Title: Pune Mns Vasant More Raj Thackeray Police Commissioner Meeting
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..