लग्नातल्या रूखवतासाठी काही वेगळे प्रकार शोधताय? या पर्यायाचा विचार करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लग्नातल्या रूखवतासाठी काही वेगळे प्रकार शोधताय का? हा विचार करा
लग्नातल्या रूखवतासाठी काही वेगळे प्रकार शोधताय? या पर्यायाचा विचार करा

लग्नातल्या रूखवतासाठी काही वेगळे प्रकार शोधताय का? हा विचार करा

लग्नात रूखवत काय ठेवावा हा मोठा प्रश्न असतो. आजकाल स्टीलच्या भांड्यांपेक्षा क्रॉकरी किंवा घर सजावटीचे साहित्य देण्याकडे कल आहे. पण तरीही काही पारंपारिक प्रकार ठेवले जातातच. शिवाय काही खाण्याचे पदार्थ विशिष्ट सजावट करून ठेवले जातात.

गोवा किंवा त्या भागात लग्न किंवा मुंजी समारंभाला असा खास फराळ रूखवत म्हणून ठेवायची पद्धत आहे. त्यासाठी दुधाचा किंवा काजू चा फराळ बनवला जातो.

यासाठी आकर्षक नाजूक रंगीबेरंगी छोट्या छोट्या आकृत्या बनवून रुखवतात ठेवल्या जातात.

 हा प्रकार फ्रिजमध्ये न ठेवता बाहेर 8 दिवस टिकतो. रुखवतातले असे पदार्थ बघून खायचे कसे असा प्रश्न नेहमीच पडतो. पण हे पदार्थ तुम्ही खाऊ शकता.

बरेचदा असे प्रकार करताना नैसर्गिक रंगाचा वापर कमी केला जातो. पण यात घातलेले रंग नैसर्गिक असल्याचे हा रूखवत करणाऱ्या प्रज्ञा शिरवयकर यांनी सांगितले.

तुम्हीही तुमच्या लग्नात अशाप्रकारचा रुखवत ठेवू शकता. हा खाताही येत असल्याने वाया जाणार नाही.

मुंज किंवा बारश्यातही तुम्ही असा हटके रूखवत ठेवू शकता.

loading image
go to top