
सृजनाचा अनोखा आविष्कार असलेल्या श्रावण महिन्याचे आणि समस्त महिलावर्गाचे एक वेगळेच नाते असते. रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात रूढी, परंपरांचे संगोपन करतानाच सण आणि उत्सवाच्या निमित्ताने का होईना नटून, थटून मिरवण्याची आपली हौस त्या पूर्ण करत असतात.
महिलांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळावे, त्यांना स्वतःला व्यक्त करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध व्हावे आणि केवळ
मनोरंजनच नव्हे तर आर्थिक, शैक्षणिक क्षेत्राबाबतही जागरूक राहावे लागेल सकाळ नेहमीच नवनविन उपक्रम राबवित असते. सकाळ श्रावण सरी चे यंदाचे हे चौथे वर्ष.