सृजनाचा अनोखा आविष्कार असलेल्या श्रावण महिन्याचे आणि समस्त महिलावर्गाचे एक वेगळेच नाते असते. रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात रूढी, परंपरांचे संगोपन करतानाच सण आणि उत्सवाच्या निमित्ताने का होईना नटून, थटून मिरवण्याची आपली हौस त्या पूर्ण करत असतात. .महिलांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळावे, त्यांना स्वतःला व्यक्त करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध व्हावे आणि केवळ मनोरंजनच नव्हे तर आर्थिक, शैक्षणिक क्षेत्राबाबतही जागरूक रहावे यादृष्टीने सकाळ नेहमीच नवनविन उपक्रम राबवित असते. सकाळ श्रावण सरी चे यंदाचे हे चौथे वर्ष. १७ ऑगस्ट ते 22 ऑगस्ट ठाणे, दादर, कल्याण, वाशी, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, कोल्हापूर, नागपूर आणि संभाजीनगर – अशा दहा शहरांमध्ये पावसाच्या धुवांधार सरींसोबत 'सकाळ श्रावण सरी' हा सोहळा सुद्धा रंगला होता..17 ऑगस्ट रोजी ठाणे येथे कुर्ला ते वेंगुर्ला या मराठी चित्रपटातील कलाकार अभिनेत्री वीणा जामकर, अनघा राणे व दिग्दर्शक विजय कळमकर यांची ऊपस्थिती होती तर 19 ऑगस्ट रोजी कल्याण येथे अभिनेत्री रसिका चव्हाण यांनी आपल्या ओघवत्या शैलीत निवेदन करून प्रेक्षकांची मने जिंकली. 20 ऑगस्ट रोजी दादर येथे बिन लग्नाची गोष्ट चित्रपटातील कलाकार डाॅ. गिरीश ओक व निवेदिता जोशी सराफ यांच्याशी निवेदिका धनश्री दामले प्रधान यांनी मारलेल्या गप्पांमधून चित्रपटाची कथा ऊलगडली तर 21 ऑगस्ट वाशी येथे अभिनेत्री ऊर्मिला जगताप उपस्थित राहीली..सणांची उधळण आणि स्पर्धांची रेलचेल असलेल्या या पारंपारिक सोहळ्यात एचडीएफसी म्युचुअल फंड (फायनांशियल लिट्रसी पार्टनर ) यांनी 'बरणी से आझादी' या उपक्रमाद्वारे महिलांना पैशाची बचत आणि गुंतवणूक याबाबत जागरूक केले. तर ब्रेव्हरेज पार्टनर सोसायटी टी ने महिलांना चहा तर पाजलाच पण त्याचबरोबर टी टाईम मी टाईम स्पर्धेमध्ये महिलांच्या मनातील आनंद, व्यथा, कथा याद्वारे त्यांना व्यक्त केले आणि त्याचबरोबर ट्रॅव्हल पार्टनर केसरी टूर ने सुद्धा पर्यटनावर आधारित प्रश्न विचारून बक्षिसे दिली. शिवाय लकी ड्रॉ द्वारे महीलांना मोफत नेपाळ ट्रीप सुद्धा घोषित केली आहे..या सर्व धम्माल मस्ती साठी शरीराची काळजी तेव्हढीच महत्वाची आहे आणि म्हणुनच रिसर्च आयुने महीलांना मोलाचे सल्ले पण दिले. सहयोगी प्रायोजक गोदरेज, ईव्हेंट पार्टनर मी मंत्रा, वुई मुक्ता यांचे सुद्धा सहकार्य लाभले होते.या कार्यक्रमात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे, सण आणि उत्सव याकाळात होणारे प्रदुषण आणि पर्यावरणाचा होणारा रहास रोखण्यास एक जबाबदार नागरिक म्हणून महिलांना आवाहन करण्यात आले व मी पर्यावरण सखी स्पर्धे द्वारे कापडी पिशव्यांचा वापर, वृक्ष लागवड आणि संवर्धन, ओला - सुका कचरा विघटन याबाबत महिलांचे विचार सुद्धा ऐकले. विशेष आकर्षण होते बालगंधर्व पुरस्कार प्राप्त आशिमिक कामठे यांच्या बहारदार नृत्याचे..रोजच, कुटुंब आणि इतर कामे अशी तारेवरची कसरत करत घर सांभाळणाऱ्या स्त्रियांना त्यांचे छंद, आवडीनिवडी जोपासायला मिळणारे कार्यक्रम वर्षभर व्हावेत, करमणूकी बरोबरच जागरूकतेसाठी सुद्धा कार्यक्रम व्हावेत असे आवाहन सकाळ श्रावण सरीत उपस्थित असलेल्या महिलांनी केले..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.