Salary Management : पगार झाला खरा, पण अर्धा लगेच कर्ज फेडण्यात गेला? ट्राय करा या ६ टिप्स | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Salary Management

Salary Management : पगार झाला खरा, पण अर्धा लगेच कर्ज फेडण्यात गेला? ट्राय करा या ६ टिप्स

Salary Management : दहा तारीख उलटली आहे, जवळजवळ सगळ्यांचे पगार झाले असतील... पगार झाला की पहिली गोष्ट डोक्यात येते अन् ती म्हणजे, मागच्या महिन्यात घेतलेल कर्ज किंवा उधारी... आता ही उधारी परत करण्यात आणि इतर कर्जाचे हफ्ते फेडण्यात आपला अर्धा पगार निघून जातो. शिवाय जर तुमच्याकडे क्रेडिट कार्ड असेल तर मग काही विचारायला नको. मग तर तुमच्या खर्चाला काही बांध उरत नाही.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे एखाद्याने कर्ज, क्रेडिट कार्ड इत्यादीसारख्या अनेक क्रेडिट्स सोर्सेस तेव्हाच घ्याव्यात, जेव्हा त्याच्याकडे वेळेवर परतफेड करण्याची क्षमता आहे. कर्ज घेतलेल्या पैशाचे योग्य व्यवस्थापन केले नाही तर ‘कर्जाच्या सापळ्यात’ अडकण्याची शक्यता वाढते.

कर्जाच्या सापळ्यात अडकणे टाळण्यासाठी अवलंबा ६ पर्याय

१. तुमची थकबाकी नेहमी वेळेवर भरा

कर्जाचा सापळा टाळण्याची पहिली पायरी म्हणजे तुमची क्रेडिट कार्ड बिले आणि कर्जाचे ईएमआय वेळेवर आणि पूर्ण भरणे. हवं तर यासाठी तसं प्लॅनिंग करा आणि स्लॉट्समध्ये पेमेंट करा.

२. कर्जाचे विश्लेषण करा

आपल्याकडे असलेल्या कर्जाच्या प्रकारांचे विश्लेषण करणे ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. आपल्या कर्जाचे प्रकार, कर्जाचा कालावधी, प्रत्येक कर्जाशी संबंधित व्याजदर, एकूण थकबाकी, याकडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. जर तुम्ही तुमची देयके देण्यास उशीर केला तर अधिक व्याज सहन करावे लागेल.

३. तुमची जीवनशैली बदला

अनेकदा, आपली जीवनशैली आपल्या कर्जाचे कारण ठरते, आपल्या सवयींमध्ये बदल करणे, अनावश्यक खर्चांवर बंधन ठेवणे ही उत्तम कर्ज व्यवस्थापनाची सुरुवात आहे. मासिक बजेट तयार करा आणि आपल्या पगाराचे व्यवस्थापन करा म्हणजे सेव्हींज सुद्धा होईल.

४. आपल्या गोष्टी प्राधान्य क्रमांनुसार करा.

एकदा आपल्याला आपल्या महत्वाच्या गोष्टी कळल्या की आपण त्यांना प्राधान्य देऊन आपल्या रोजच्या खर्चांवर नियंत्रण ठेवू शकतो. आपल्याला गरजेची नसलेली एखादी वस्तू आपल्या प्राधान्यक्रमाच्या यादीत जास्त असेल, तर कदाचित यावर पुनर्विचार करण्याची गरज आहे.

५. कर्जाचे एकत्रीकरण

कर्ज एकत्रीकरण म्हणजे एक कर्ज घेऊन बाकी सर्व कर्जे साफ करणं. महिन्याच्या सुरुवातीस एकच पेमेंट तारीख सेट केला तर पगार मिळेल त्याचवेळी थकबाकी भरुन मोकळे व्हा. एकदा मासिक उत्पन्नातून महिन्याचे कर्ज भरले की, उरलेल्या रकमेसह महिन्याचे व्यवस्थापन कसे करायचे याकडे लक्ष देणं सोप्पं होईल.

६. एमर्जन्सी निधी तयार करा

शेवटचा पण सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एमर्जन्सी निधी असणे. जर अचानक काही उद्भावलं तर काय करणार? अशा वेळेस हाच पैसा कामात येईल, विशेषतः मंथ एंडच्या वेळी. त्यामुळे या गोष्टीचा विचार करुन व्यवस्थित प्लॅनिंग करुन पैसे साठवणे गरजेच आहे.

टॅग्स :moneyEmployeessalary