How To Save Money : कोणत्या वयात किती सेव्हींग करावी? जाणून घ्या सोपी फार्म्यूला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

How To Save Money

How To Save Money : कोणत्या वयात किती सेव्हींग करावी? जाणून घ्या सोपी फार्म्यूला

आजच्या धावपळीच्या आयुष्यात आपण अनेकदा फ्युचर प्लॅन मिस करतो आणि मग रिटायरमेंटनंतर कसं होणार, याचं टेन्शन घेतो. रिटायरमेंट नंतर पश्चाताप होण्याची वेळ येऊ नये यासाठी योग्य वयात सेव्हींग करणे गरजेचं आहे पण तुम्हाला माहिती आहे का कोणत्या वयात किती सेव्हींग करावी? चला तर जाणून घेऊया सोपी फार्म्यूला. (How To Save Money)

खरं तर कोणत्याही वयात तुम्ही इनवेस्ट किंवा सेव्हिंग करू शकता. त्यासाठी वयाचं बंधन नाही. मात्र योग्य वयात जर तुम्ही सेव्हींग केली तर तुम्हाला त्याचा अधिक फायदा होतो.

वयाच्या 25 ते 35 वर्षामध्ये सेव्हींग करण्याचा फार्मूला

या वयात आपण खूप जिंदादिल असतो. कमी कमवतो पण तुफान खर्च करतो. ज्यामुळे आपण सेव्हींग करण्यास अपयशी ठरतो.पम जर या वयात तुम्ही सेव्हींग सुरू केली तर तुमचे लक्ष्य खूप सोप्या पद्धतीने गाठू शकता.

उदाहरण 25 वर्षाचा युवक दर महिन्याला केवल 2000 रुपये SIP करतो तर साठ वर्षापर्यंत त्याच्याकडे जवळपास 1 कोटी 35 लाख रुपये जमा होऊ शकतात. ज्यामुळे 25 ते 35 वर्षीय व्यक्ती रिटायरमेंटवर दोन करोड आरामात कमावू शकता. जर 35 वर्षीय व्यक्ती दर महिन्याला दहा हजार रुपये इनवेस्ट करत असेल आणि 25 वर्षीय व्यक्ती दर महिन्याला ३ हजार रुपये इनवेस्ट करत असेल तर साठ वर्षापर्यंत आरामात दोन कोटी कमावू शकतात.

वयाच्या 40 व्या वर्षामध्ये सेव्हींग करण्याचा फार्मूला

40 नंतर सेव्हींग करुन वयाच्या साठव्या वर्षापर्यंत दोन कोटी कमावणे कठीण असतं.त्यासाठी 40 व्या वर्षी महिन्याचे 20 हजार सेव्हींग करावी लागेल. त्यामुळे कमी वयात म्हणजेच 25 ते 35 वर्षाच्या वयोगटात सेव्हींग करणे कधीही चांगले.

इनवेस्ट करताना फक्त SIP मध्ये करु नका करा तर वेगवेगळ्या ठिकाणीही तुम्ही इनवेस्ट करू शकता. अनेकजण सरळ इक्वीटी मार्केटमध्ये पैसे लावतात कारण त्यापासून चांगला रिटर्न मिळण्याची शक्यता असते. मात्र हे तितकंच जोखीम आहे.