
सामुद्रिक शास्त्रानुसार माणसाच्या शरिराचे एक एक भाग आपल्या नशीबाविषयी आणि भविष्याविषयी संकेत देत असतात. आपल्या हाताचे अनामिका बोट ज्याला रिंग फिंगर सुद्धा म्हटले जाते. आज आपण या बोटाविषयी जाणून घेणार आहोत. सामुद्रिक शास्त्रानुसार आपल्या हाताच्या अनामिका बोटाचे विशेष महत्त्व आहे. कारण या बोटाच्या खाली सूर्य पर्वताचा आकार असतो.
आज आपण अनामिका बोटाचे महत्व आणि त्याची विशेषत: जाणून घेणार आहोत. चला तर जाणून घेऊया अनामिका बोटाचे धन संपत्तीशी कसे नाते आहेत. (Samudrik Shastra ring finger of hand astro tips to become rich )
ज्यांचं अनामिका बोट तर्जनी पेक्षा मोठं असतं, हस्तशास्त्रानुसार असे लोक स्वाभिमानी असतात. एवढंच काय तर हे लोक अतिशय भावनिक असतात आणि कुणाचीही मदत करायला सहज तयार होतात.
जर अनामिका आणि तर्जनी बोट एकसमान असेल तर असे लोकांना स्वतंत्र जीवन जगण्यास आवडते. अशा लोकांना प्रत्येक गोष्टीत टोकलेलं आवडत नाही विशेष म्हणजे या लोकांना कुणाच्याही गोष्टीत हस्तक्षेप करायला आवडत नाही. वैयक्तिक जीवनातही हे खूप खुश असतात.
ज्या लोकांची अनामिका तर्जनी बोटापेक्षा मोठी असते ते लोक धन कमावण्यात अग्रेसर असतात. अशा लोकांचं भविष्य नेहमी उज्वल असतं. असे लोक कोणत्याही गोष्टीचा जास्त विचार करत नाही. याशिवाय हे इतरांवर लोक दबाव बनविण्याचा प्रयत्न करतात.
जर अनामिका बोट वाकलेलं असेल असे लोक नोकरी, व्यवसाय आणि बौद्धिक क्षेत्रात धन कमवतात. अशा लोकांवर देवी लक्ष्मीची नेहमी कृपा असते. यांच्या आयुष्यात कधीही आर्थिक समस्या निर्माण होत नाही. असे लोकांमध्ये टॅलेंटची कमतरता नसते. सामुद्रिक शास्त्रानुसार ज्या लोकांमध्ये अनामिका बोटाच्या खाली सुर्य किंवा पर्वत दिसत असेल तर अशा लोकांच्या घरात सदैव पैसा येत असतो.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.