

From Anchoring to Acting: A New Identity as Bhanu Aaji in Sanai Choughade
esakal
राधिका चव्हाण, अभिनेत्री
आयुष्यात कधी कोणती संधी आपल्यासमोर येईल, हे सांगता येत नाही. मात्र, आलेल्या संधीचे सोने करण्याची तयारी आपल्यात असली पाहिजे. माझ्या आयुष्यातही असाच एक अनपेक्षित बदल घडला आणि निवेदनाच्या क्षेत्रातून मी अभिनयाकडे वळले. आज ‘सनई चौघडे’ या मालिकेतील ‘भानू आजी’ या भूमिकेमुळे मला नवी ओळख मिळाली आहे. ही माझ्या आयुष्याची दुसरी इनिंग आहे.