Ukulele: अमेरिकेला पाक विरुद्ध जिंकून देणाऱ्या सौरभ नेत्रावळकरच्या हातातलं ते वाद्य नेमकं काय आहे?

Saurabh Netravalkar: सौरभ नेत्रावळकरचा व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये गिटारचा एक प्रकार असलेले युकुलेले हे वाद्य वाजवताना दिसत आहे. या वाद्याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया.
Ukulele
UkuleleSakal

Saurabh Netravalkar: टी20 वर्ल्डकप 2024 मध्ये यजमान अमेरिकेला पाक विरूद्ध जिंकून देण्यात मराठमोळ्या सौरभ नेत्रावळकरचा सिंहाचा वाटा आहे. त्याने सामन्यात २ विकेट्स घेतल्या त्याचबरोबर सुपर ओव्हरमध्ये १८ धावा डिफेंड करत अमेरिकेला एतिहासिक विजय मिळवून दिला आहे.

सौरभ मल्टी टास्कर देखीलआहे. तो सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. तसेच त्याला वाद्य वाजवण्यात आणि गाणं म्हणण्याची आवड आहे. सौरभने इंस्टावर हा व्हिडिओ शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये तो त्याचे मन उधाण वाऱ्याचे हे मराठी गाण म्हणत आहे आणि गिटारचा एक प्रकार असलेले युकुलेले हे वाद्य वाजवताना दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव होत आहे.

दरम्यान तो वाजवत असलेलं युकुलेले हे वाद्य कसे वाजवतात आणि त्याचे फायदे काय आहे हे जाणून घेऊया.

युकुलेले हे सामान्य नायलॉनच्या तारापासून बनवलेले असते. हे वाद्य गिटारचा एक प्रकार आहे. कोणत्याही वयात हे वाद्य वाजवायला शिकू शकतो. युकुलेले चार वेगवेगळ्या आकारात, पिच, टोन, फ्रेटबोर्डमध्ये मिळतात.

युकुलेलेचा वापर वेगवेगळ्या स्टेज परफॉर्मन्स, गायन स्पर्धा, लाइव्ह परफॉर्मन्समध्ये केला जातो. त्याचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे कोणीही ते वाजवू शकते. तुम्ही संगीतकार असलात किंवा नसलात तरी सहज हातात पकडून वाजता येऊ शकते.

इतिहास

युकुलेला समृद्ध इतिहास आणि परंपरा आहे. हे वाद्य सर्वात आधी अठराव्या शतकात हवाईमध्ये आले. पण त्याचे मुळे पोर्तुगालमध्ये आढळतात. प्रत्यक्षात युकुलेचा शोध कोणी लावला हे माहित नाही. युकुलेले गिटारचा एक छोटा प्रकार आहे. 1879 च्या सुमारास ब्रागुइन्हा नावाच्या पोर्तुगीज माणसाने ते वाद्य आणले होते. युकुलेले हे सामान्य नायलॉनच्या तारापासून बनवलेले असते. युकुलेले चार वेगवेगळ्या आकारात, पिच, टोन, फ्रेटबोर्डमध्ये मिळतात.

फायदे

युकुलेले वाजवण्याचे अनेक फायदे आहेत. तुम्ही लहान मुलांना देखील हे वाद्य वाजवायला शिकवू शकता. युकुलेले पोर्टेबल असून पकडायला सोयीस्कर असते. तसेच गिटारच्या तुलनेत हे वाजवायला सोपे आहे. लहान मुले सहज हे वाद्य पकडू शकतात. जर तुम्ही मुलांना गिटार शिकवायचा विचार करत असाल तर युकुलेले योग्य वाद्य आहे.

युकुलेले वाजवल्याने डोक, हात आणि डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते. तसेच हे वाद्य वाजवताना लक्ष केद्रिंत करणे गरजेचे असते यामुळे तुमची एकाग्रता वाढते. युकुलेले वाद्यावर सहज कोणतेही गाण शिकू शकता. तसेच शरीराची रोग प्रतिकारशक्ती वाढते. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की हे वाद्य वाजवल्याने मानसिक ताण कमी होतो. तुम्ही युकुलेले दुकानात किंवा ऑनलाइन देखील खरेदी करू शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com