25 वर्षाच्या मुलीनं 16 दिवसांत जगातील सर्वोच्च शिखरं सर करुन केला नवा 'विक्रम' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Savita Kanswal

तिच्या समोर अनेक अडचणी होत्या आणि बऱ्याच समऱ्या देखील; पण ती कधीच मागं हटली नाही.

25 वर्षाच्या मुलीनं 16 दिवसांत जगातील सर्वोच्च शिखरं सर करुन केला नवा 'विक्रम'

मुंबई : तिच्या समोर अनेक अडचणी होत्या आणि बऱ्याच समऱ्या देखील; पण ती कधीच मागं हटली नाही. ती एक मुलगी होती म्हणून तिला घरात आणि बाहेर लिंगभेदाचा सामनाही करावा लागला. तिच्या घरच्यांनी ती एनसीसीमध्ये (NCC) जावू नये म्हणून आक्षेप घेतला, तिला विरोध केला. अशा परिस्थितीत घरात राहून एखाद्या मुलीला आयुष्यात काहीतरी मोठं करण्यासाठी संघर्ष करणं किती कठीण झाले असेल. पण, ती काही सामान्य मुलगी नव्हती. तिनं स्वत:कडं बूट नाही, म्हणून सहा हजारांची नोकरी केली आणि जगातील सर्वोच्च शिखर तिनं सहज पूर्ण केलं.

सविताच्या धाडसाचं कौतुक

उत्तराखंडमधील (Uttarakhand) 25 वर्षीय सविता कंसवाल (Savita Kanswal) हिनं जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट (Mount Everest) आणि माउंट मकाऊ (Mount Macau) अवघ्या 16 दिवसांत जिंकून विश्वविक्रम केलाय. आता सात महाद्वीपातील सात उंच शिखरं सर करणं आणि ८ हजार मीटरवरील ९ शिखरं जिंकणं हे तिचं ध्येय आहे. आज सर्वजण सविताच्या धाडसाचं कौतुक करत आहेत, पण इथपर्यंत पोहोचणं सोपं नव्हतं. 2013 पासून 12 शिखरं सर करणारी सविता प्रतिकूल परिस्थितीतही लक्ष्यापासून दूर गेली नाही.

Mount Everest

Mount Everest

हेही वाचा: आज पैगंबर हयात असते तर मुस्लिम कट्टरवाद्यांचा वेडेपणा पाहून..; काय म्हणाल्या नसरीन?

एनसीसी प्रशिक्षणाला कुटुंबीयांचा विरोध

उत्तरकाशी (Uttarkashi) जिल्ह्यातील लोंथरू गावात राहणारी सविता चार बहिणींमध्ये सर्वात लहान आहे. चार किलोमीटर चालत शाळेत जाणाऱ्या सवितानं कौटुंबिक विरोधाला न जुमानता एनसीसीचं प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. शाळेनंच तिचं नाव पुढील प्रशिक्षणासाठी पाठवलं होतं. अॅडव्हान्स कोर्ससाठी तिच्याकडं पैसे नव्हते, म्हणून ती नोकरी करू लागली. तिला महिन्याला फक्त 6,000 रुपये पगार मिळायचा. 2016 मध्ये तिनं पर्वतारोहण अभ्यासक्रम पूर्ण केला आणि 2019 मध्ये इंडियन माउंटेनियरिंग फाउंडेशनच्या (Indian Mountaineering Foundation) एव्हरेस्ट कॅम्पसाठी 1000 लोकांमधून निवडलेल्या 12 सहभागींपैकी सविता ही एक होती.

हेही वाचा: 'या' खेळाडूंना दुसरी संधी कधी मिळालीच नाही; भारतासाठी खेळला फक्त 1 एकदिवसीय सामना

सवितानं 'ही' शिखरं जिंकली

  • माऊंट त्रिशूल (7120 मीटर) एव्हरेस्टपूर्व,

  • माउंट टुलियन (4800 मीटर),

  • माउंट लॅबौचे शिखर (6119 मीटर)

  • माउंट लोहत्से

Web Title: Savita Kanswal From Uttarakhand Set World Record By Climbing The Worlds Highest Peaks Mount Everest And Mount Macau

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top