

savitribai phule jayanti
Sakal
Savitribai Phule Jayanti: भारतीय समाजाच्या इतिहासात सावित्रीबाई फुले यांचे नाव सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले आहे. म हिलांच्या शिक्षणाची मशाल हातात घेऊन समाजातील अंधश्रद्धा, रूढी-परंपरा आणि अन्यायाविरुद्ध त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. त्या केवळ पहिल्या महिला शिक्षिका नव्हत्या, तर समाजक्रांतीच्या अग्रदूत होत्या. ज्या काळात मुलींना शिक्षण देणे पाप मानले जात होते, त्या काळात सावित्रीबाईंनी शाळा सुरू करून हजारो मुलींच्या आयुष्याला नवी दिशा दिली. अपमान, टीका आणि सामाजिक बहिष्कार सहन करूनही त्यांनी आपले ध्येय सोडले नाही. शिक्षण, समानता आणि स्वाभिमानाचा संदेश त्यांनी आपल्या विचारांतून आणि कृतीतून दिला. सावित्रीबाई फुलेंचे विचार आजही तितकेच प्रेरणादायी आणि मार्गदर्शक आहेत. आज त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे प्रेरणादायी विचार जाणून घेऊया.