Second Marriage : दुसऱ्या लग्नात अडकताना स्वत:ला हे प्रश्न नक्की विचारा, निर्णय घेणं सोप्प जाईल

कुटुंबाकडून दडपण आणलं जातंय का?
Second Marriage
Second Marriageesakal

Second Marriage :

प्रेम, विश्वास, आपुलकी यासह एक लग्न टिकवण्यासाठी जबाबदारीची जाणिवही महत्त्वाची असते. कारण, लग्न, नातं दोघांचे असते पण जबाबादारी मात्र एकटाच कोणीतरी घेतो तेव्हा वाद होऊन नातं संपुष्टात येतं.

काही लोकांच्या बाबतीत असं होतं की, जबाबदारी, प्रेम, जीव लावणारा जोडीदार भेटतो पण त्याचा अचानक मृत्यू होतो. तेव्हा सगळ्या जबाबदाऱ्या एकाच व्यक्तीवर येऊन पडतात. त्यावेळी मुलांच्या भविष्यासाठी पुन्हा लग्न करण्याचा निर्णय घ्यावा लागतो.  

पण काहीवेळा पुन्हा कर्तव्यात अडकण्याच्या आधी काही प्रश्नांची उत्तरे शोधणे गरजेचे असते. कारण, पुढे जाऊन हे दुसरे लग्नही तुटण्याची शक्यता असते. आणि पहिल्या लग्नाच्या तुलनेत दुसरे लग्न तुटण्याचे प्रमाण जास्त असल्याचे एका सर्व्हेत समोर आले आहे.

Second Marriage
Dhule Child Marriage : गोताणे गावातील बालविवाह रोखला; तक्रारीनंतर तत्काळ कार्यवाहीमुळे प्रशासनाला यश

कुटुंबाकडून दडपण येतंय का?

जोडीदारापासून वेगळे होण्याचा निर्णय कोणासाठीही सोपा नसतो यात शंका नाही. विभक्त झाल्यानंतर तुम्हाला त्या सर्व गोष्टी सांभाळाव्या लागतील ज्या पूर्वी पती-पत्नीची जबाबदारी होती. हे शक्य आहे .

काहीवेळा तुमचे कुटुंबीय तुमच्यावर पुन्हा लग्न करण्यासाठी दबाव आणू शकतात. परंतु या काळात तुम्हाला हे समजून घ्यावे लागेल की तुम्ही नवीन जोडीदारासह पुन्हा लग्न करून तुमच्या गोष्टींची काळजी घेऊ शकाल की नाही.

तुमच्या मनातून उत्तर 'हो' असेल तरच लग्न करण्याचा निर्णय घ्या. कुटुंब किंवा तुमचे मित्र तुम्हाला दुसऱ्या लग्नासाठी प्रवृत्त करू शकतात. पण तुम्हाला तुमच्या आयुष्यातून काय हवंय हे तुम्हीच ठरवायचं?

Second Marriage
Nashik Marriage Registration: सुरक्षेच्या दृष्टीने विवाह नोंदणीला प्राधान्य! पिंपळगाव बसवंत ग्रामपंचायतीत नोंदणीचा वाढला टक्का

भुतकाळातील आठवणींनी पाठ सोडलीय का?

जेव्हा लोक पुनर्विवाह करतात. तेव्हा ते अनेकदा त्यांच्या पहिल्या लग्नातील वाईट गोष्टी आठवून नव्या जोडीदारासोबतही तसेच वागतात. त्यामुळे नवे नातेही संपुष्टात येते. त्यामुळे पुन्हा लग्नाचा विचार करताना तुमच्या भुतकाळातील जोडीदाराच्या आठवणी विसरून मग त्याच्यासोबत नातं जोडायला हवं. तसेच तुम्हाला भुतकाळातील गोष्टी विसरता येत नसतील तर तुम्ही लग्नाची घाई करणे चुकीचे ठरेल.

Second Marriage
Rupert Murdoch Marriage : ९२ वर्षी पाचव्यांदा बोहल्यावर! मीडिया मुगल मरडॉकची होणारी बायको रुपानं देखणी

एकटेपणा आहे म्हणून लग्न करताय का?

नातं निर्माण करताना सर्वात आधी हा विचार केला जातो की, तुम्ही एकटे पडला आहात का?, घरातील व्यक्तीही पतीच्या निधनानंतर, किंवा घटस्फोटानंतर दुसरे लग्न लावण्यावर जोर देतात. कारण, आपली मुलगी, सून एकटी पडेल असे त्यांना वाटते. तेव्हा तुम्ही केवळ एकटे पडताय म्हणून दुसरं लग्न करत असाल तर त्यावर विचार करा. कारण, जोडीदार योग्य नसेल तरी तुम्हाला एकटेपणा जाणवू शकतो.  

Second Marriage
Fraud Marriage: पैशांचा लोभ.. भाऊ-बहिणीलाच घ्यायला लावले 'सात फेरे'; प्रकरण नेमकं काय?

तुम्ही प्रामाणिक रहाल का?

नवे नाते जोडण्यासाठी प्रामाणिकपणाची भक्कम भिंत उभी करावी लागते. तुम्ही तुमच्या जोडीदारासोब, नात्यातील जबाबदाऱ्यांबाबत प्रामाणिक रहाल, याची खात्री असेल तरच नव्या नात्याचा विचार करावा.

तुमच्या पूर्वीच्या नात्यात काय चूक झाली आहे हे तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत जितक्या उघडपणे चर्चा कराल तितके तुम्हाला तुमच्या जोडीदाराशी एकरूप झालेले वाटेल. त्यामुळे त्याच्याशी चर्चा करून मगच तुम्ही नाते निर्माण करायचे की नाही हे ठरवा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com