
डॉ. समीरा गुजर-जोशी
एखादी गोष्ट कशी करावी हे सांगणारी ‘how to...’ पुस्तकं खूप असतात. ‘तुम्ही प्रभावशाली कसे व्हाल’, ‘उत्तम वक्ते कसे व्हाल’, ‘यशस्वी कसे व्हाल’... इत्यादी इत्यादी. त्यात वीस दिवसांत अमुक होईल, महिन्याभरात ‘हे’ शक्य करा अशी आश्वासनंही असतात. मला तरी ही पुस्तकं बुकशेल्फवर बघून वाटायचं, कोण वाचत असेल ही? पुस्तकं वाचून का शिकता येत असेल प्रभावशाली होणं, उत्तम वक्ता होणं? पुढे मग कुणी मैत्रिणीनं सुचवली म्हणून, हे पुस्तक खूपच चर्चेत आहे तर वाचलं पाहिजे, अशा निमित्तानं अशा प्रकारची पुस्तकं वाचण्यात आली.