मने जोडणारी निःस्वार्थ मैत्री !

मैत्री ही भावना दोन व्यक्तींना अंतःकरणापासून जोडते. खरी मैत्री निःस्वार्थ असते. असंच नातं आहे अभिनेत्री शिवानी मुंढेकर आणि काजल काटे यांचं.
selfless friendship bond of shivani mundhekar kajal kate
selfless friendship bond of shivani mundhekar kajal kateSakal

मैत्री ही भावना दोन व्यक्तींना अंतःकरणापासून जोडते. खरी मैत्री निःस्वार्थ असते. असंच नातं आहे अभिनेत्री शिवानी मुंढेकर आणि काजल काटे यांचं. त्यांची पहिली भेट ही ‘मुरांबा’ मालिकेच्या सेटवरच झाली. ‘मुरांबा’ या स्टार प्रवाह वाहिनीवरील मराठी मालिकेमध्ये शिवानी आणि काजल दोघी एकत्र काम करतात. 

याबद्दल शिवानी म्हणाली, ‘‘काजल सेटवर येण्यापूर्वी खूप चर्चा चालू होती, की नवीन मुलगी येणार आहे. मी खूप उत्सुक होते, की कोण असेल ती नवीन मुलगी? काजल पाहिल्यांदा सेटवर आली होती, तेव्हा आमचे सीन एकत्र होते.

दरम्यान आम्ही मेकअप रूममध्ये बसलो होतो. काजलचं जे पात्र होतं, त्यासाठी तिला तिचं नेलपेंट काढावं लागणार होतं. मात्र, तिनं त्याचवेळी नखांना एक्स्टेंशन केलं होतं आणि मेकअपदादा बिचारे नेलपेंट काढण्यासाठी म्हणून रिमूव्हरनं प्रयत्न करत होते.

त्यावेळी मी काजलकडे बघत होते, की ती त्यांना सांगेल एक्स्टेंशनबद्दल, पण ती गप्प बसली होती. खूप वेळानंतर तिनं त्यांना सांगितलं आणि त्यावेळी मला एवढं हसू आलं. तिचं हे वागणं बघून मला समजलं, की जाम खोडकर मुलगी आहे, आणि माझं हिच्याशी पुढे खूप चांगलं जमेल. ’’

काजल सांगत होती, ‘‘शिवानीला पहिल्यांदा पाहिल्यावर मला वाटलं होतं, की हिच्यात खूप अॅटिट्यूड असेल, पण मी मेकअपदादांची गंमत केली, त्यावेळी शिवानी खूप हसली आणि तिची ही प्रतिक्रिया बघून मी समजून गेले, की ही खूप फ्री आहे.

तिथूनच आम्ही एकमेकींना छान कनेक्ट झालो. मी येण्यापूर्वी आमच्या सेटवर फक्त शिवानी एकटी मस्तीखोर होती आणि मी देखील अगदी तशीच आहे. आम्हा दोघींची मैत्री झाल्यानंतर सगळे आता या दोघी बडबड करत राहतात, मस्ती करत राहतात असं म्हणायला लागले आहेत. ’’

पुढे शिवानी म्हणाली, ‘‘मी सुरुवातीला खूपच इंट्रोवर्ट होते. छोट्या शहरातून आपण मोठ्या शहरात येतो, तेव्हा कोणतीही गोष्ट करताना म्हणजे अगदी मॉलमध्ये तिथल्या सेलर्सना इथं ही गोष्ट मिळते का? हे विचारणंही खूप कठीण वाटायचं. त्यामुळे मी माझं काम झालं, की सरळ घरी जायचे.

मात्र, माझी काजलशी मैत्री झाली, त्यानंतर तिनं मला अशा बेसिक गोष्टीही शिकवल्या आणि आता मला त्या बऱ्यापैकी जमतात. ’’ याबद्दल काजल सांगत होती, की शिवानी कुठं बाहेर जायला नकार द्यायची, तेव्हा मला तिच्यातली सुरुवातीची मी दिसायची. मग मी तिला सांगितलं, की हे तुला जेवढं कठीण वाटतं तेवढं ते नाहीये. तू करू शकतेस. त्यामुळे तू सगळ्या गोष्टी एक्सप्लोअर कर. 

शिवानीनं सांगितलं, की आमच्यात अनेक गोष्टींमध्ये साम्य आहे. आम्ही अनेक गोष्टींमध्ये अगदी सारखेच विचार करतो. आणि म्हणूनच मला तिचा स्वभाव खूप आवडतो. तिच्या स्वभावातील मला न आवडणारी गोष्ट म्हणजे तिचा राग.

ती कधी कधी प्रचंड रागावते. आणि त्यामध्ये ती काय बोलून जाते ते तिला पण कळत नाही. म्हणून मग ती शांत होते, तेव्हा तिला समजावते आणि सांगते, की तू हे इथं जरा जास्त बोललीस, असं बोलायला नको होतं. राग शांत झाला, की ती माझं बोलणं समजूनही घेते. काजल म्हणाली, ‘‘शिवानी सगळ्या गोष्टींमध्ये हिरीरीने पुढाकार घेते, पण बऱ्याचदा ती एकाचवेळी अनेक दगडांवर पाय ठेवायला जाते. मला वाटतं, की तिनं थोडं स्थिर व्हावं.’’

(शब्दांकन : मयुरी गावडे)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com