- स्वराज नागरगोजे आणि प्रगती माने
‘झी मराठी’वर अलीकडेच प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या ‘तारिणी’ या मालिकेत अभिनेता स्वराज नागरगोजे नायकाच्या भूमिकेत झळकत आहे. मालिकेबाहेरही त्याचं आयुष्य तितकंच रंगतदार आहे, कारण त्याच्या सोबत आहे त्याची जिवलग मैत्रीण प्रगती माने. दोघांची ही मैत्री डान्स क्लासपासून सुरू झालेली असून आजही तितक्याच गोड आठवणी आणि निःस्वार्थ बंधन जपणारी आहे.