५ रुपयांचे नाणे देईल ८ लाखांची मिळकत... जाणून घ्या कसे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

5 rupees

५ रुपयांचे नाणे देईल ८ लाखांची मिळकत... जाणून घ्या कसे

मुंबई : आजकाल जुन्या नोटा आणि नाण्यांचा लिलाव केला जातो. काही संकेतस्थळांवर जुन्या नोटा आणि नाण्यांची लाखो रुपयांमध्ये खरेदी आणि विक्री केली जाते. काहींना पुरातन वस्तू जपून ठेवण्याचा छंद असतो.

हेही वाचा: दहा रुपयांचे नाणे स्वीकारण्यास नकार!

ज्यांना जुन्या नोटा व नाणी जमवण्याचा छंद असतो ते लोक या नोटा-नाण्यांसाठी वाट्टेल ती किंमत द्यायला तयार असतात. त्यामुळे तुमच्याकडे अशा काही नोटा आणि नाणी असतील तर तुम्ही एका क्षणात लाखो रुपये कमवू शकता. असेच एक पाचचे नाणे आहे जे तुम्हाला चांगली रक्कम कमवून देऊ शकते.

हेही वाचा: या काही छोट्या गोष्टींमुळे महिला पुरुषांकडे आकर्षित होतात

पाचचे नाणे हे सामान्य नाणे नाही. खाद्य आणि कृषी संघटनेच्या ७०व्या वर्धापन दिनानिमित्त पाचचे नाणे तयार करण्यात आले होते. हे नाणे तुम्ही ऑनलाइन विकू किंवा खरेदी करू शकता. हे नाणे तुम्हाला ८ लाख रुपये मिळवून देऊ शकते.

हेही वाचा: तुमच्या आवडत्या ब्लॅक ड्रेसवर उठून दिसतील या रंगांच्या लिपस्टिक

तुम्ही क्विकर या ऑनलाइन व्यावसायिक व्यासपीठावर जाऊन विक्रेता म्हणून नोंदणी करू शकता. तेथे आपला संपर्क क्रमांक आणि ईमेल आयडी द्यावा. त्यानंतर आपल्याकडील ५ रुपयांच्या नाण्याचे दोन्ही बाजूंचे छायाचित्र काढून पोस्ट करावे. कोणी हे नाणे खरेदी करायचे ठरवल्यास ती व्यक्ती तुमच्याशी संपर्क साधेल.

Web Title: Sell The Old Coin Of Rupees 5 And Earn Upto 8 Lakhs

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Old Coin
go to top