या काही छोट्या गोष्टींमुळे महिला पुरुषांकडे आकर्षित होतात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

man woman

या काही छोट्या गोष्टींमुळे महिला पुरुषांकडे आकर्षित होतात

मुंबई : काही वेळा पुरूष सहज काहीतरी वागून किंवा बोलून जातात. मात्र त्यांच्या छोट्या-छोट्या गोष्टी महिलांवर छाप सोडतात. जाणीवपूर्वक प्रयत्न करणाऱ्या नाही तर महिलांच्या भोवताली सहज वावरणाऱ्या पुरुषांकडे महिला आकर्षत होतात. त्यांच्या काही हालचाली, बोलण्याच्या लकबी, कपडे, इत्यादी गोष्टींवर महिला भाळतात. आज पुरुषांच्या अशाच काही गोष्टींबद्दल जाणून घेऊ या...

हेही वाचा: लग्नानंतरही पुरूष फ्लर्ट का करतात? 5 कारणे वाचा

भेदक दृष्टी

पुरूष जेव्हा भेदक दृष्टीने महिलेकडे बघतात तेव्हा ते आकर्षक दिसतात. यावेळी त्यांच्या नजरेत प्रेम, मोह किंवा इच्छा दिसते. अशाप्रकारे झालेली नजरानजर मोहक आणि आकर्षक असू शकते. नजरेला नजर भिडवल्याने दोन व्यक्तींमधील प्रेम वाढते, असे शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झाले आहे.

हेही वाचा: चूक असूनही पुरूष Sorry का बोलत नाही? 'ही' ५ कारणे असू शकतात

दुर्लक्ष करणे

पुरूष महिलांच्या जवळ जाण्यासाठी फारसे प्रयत्न करत नाहीत तेव्हा महिला त्यांच्याकडे अधिक आकर्षित होतात. ही गोष्ट विचित्र वाटत असली तरीही शास्त्रीयदृष्ट्या हे सिद्ध झाले आहे की, जी व्यक्ती फारसे लक्ष देत नाही त्या व्यक्तीकडे लोक जास्त आकर्षित होतात.

हेही वाचा: International Men’s Day 2021: का साजरा करतात पुरूष दिन... जाणून घ्या कारणे

पोशाखाची शैली

महिलांना पुरुषांची ओढ लावण्यासाठी सर्वाधिक कारणीभूत ठरते ती पुरुषांच्या कपड्यांची शैली. पुरुषांनी फॉर्मल कपडे घातल्यास ते सुसंस्कृत, जबाबदार आणि ऐटबाज वाटतात. साधे कपडे घातल्यास त्यांच्यातील खेळकर वृत्ती दिसून येते.

विनोदी वृत्ती

पुरुषांमध्ये विनोदी वृत्ती असल्यास महिलांना ते आवडते. अशा पुरुषांचा सहवास त्यांना हवासा वाटतो. महिलांना असे पुरुष जवळचे वाटतात जे त्यांना हसवतात.

Web Title: These Things Make Men Attractive To Women

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top