esakal | लिंग वक्र असल्यास काही त्रास होऊ शकतो का?
sakal

बोलून बातमी शोधा

लिंग वक्र असल्यास काही त्रास होऊ शकतो का?

तरुण वयात लैंगिकतेबद्दल वेगवेगळे प्रश्न, शंका मनात निर्माण होत असतात. अशाच काही प्रश्नांची उत्तरे या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती 'सकाळ डिजिटल'च्या माध्यमातून देणार आहेत.

लिंग वक्र असल्यास काही त्रास होऊ शकतो का?

sakal_logo
By
डॉ. अविनाश भोंडवे

स्त्री-पुरुष शारीरिक संबंधानंतर माणसाचा जन्म होतो. शरीर संबंध हा मानवाच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग असूनही त्याकडे केवळ लैंगिकतेच्या दृष्टीकोनातून पाहिलं जातं. यातून चुकीची माहिती मिळणं आणि या विषयाबाबत अनभिज्ञ असण्याची शक्यता असते. यालाही अनेक कारणे आहेत. तरुण वयात लैंगिकतेबद्दल वेगवेगळे प्रश्न, शंका मनात निर्माण होत असतात. त्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकताही असते पण योग्य त्या मार्गदर्शनाअभावी काही प्रश्न अनुत्तरीत राहतात. अशाच काही प्रश्नांची उत्तरे या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती 'सकाळ डिजिटल'च्या माध्यमातून देणार आहेत.

प्रश्न - माझे लिंग थोडेसे वक्र आहे. त्याचा काही त्रास होऊ शकतो का?

उत्तर - लिंगाची वक्रता हे बहुतेकदा पूर्ण नॉर्मल असते. तसे आपल्या शरीरात कित्येक गोष्टी थोड्या बहुत प्रमाणात वेगळ्या किंवा वक्र असतात. उदा. आपले नाक- नेहमी शरीररचनाशास्त्राच्या पुस्तकात दाखवतात, तसे सरळ नसतेच. कानांची ठेवणदेखील व्यक्ती-व्यक्तीनुसार वेगळी असतेच ना? पण हे अवयव त्यांचे नेमून दिलेले काम योग्य तर्‍हेने करतायत ना? हे महत्वाचे असते. शिश्न किंवा लिंगाची कार्ये आपण पाहिली. ती म्हणजे मूत्रविसर्जन आणि शरीरसंबंध ठेवताना वीर्यपतन. लिंगाची थोडी वक्रता शरीरसंबंध करताना किंवा वीर्यपतन होताना मुळीच आड येत नाही. तसेच लघवी करताना देखील त्याने काहीही फरक पडत नाही.

मात्र एखाद्या मुलास, या वक्रतेमुळे जर लघवी करताना खूप त्रास होत असेल, तर मात्र त्याने डॉक्टरांचा सल्ला त्वरित घ्यावा. ही वक्रता जर शारिरीक विकृती असेल, तर यामधील विशेषज्ञ असलेल्या ‘युरॉलॉजिस्ट’ना दाखवणे उचित ठरते. ते तुम्हाला याबद्दल योग्य तो उपचार सुचवू शकतील.

हेही वाचा: लिंगाचा आकार खूप लहान असल्याचा भवितव्यात काही त्रास होईल का?

प्रश्न - हस्तमैथुन कसे करतात? स्त्रिया आणि पुरुष यांच्यामध्ये ती कशी केली जाते?

उत्तर - पुरुषांमध्ये शिश्न हाताने घट्ट पकडून हाताची वर खाली अशी खूप जलद व जोरजोरात हालचाल केली जाते. वीर्यपतन होईपर्यंत ही क्रिया केली जाते. स्त्रियांमध्ये योनिबाहेरील भाग व तिथला उंचवटा एका बोटाने किंवा हाताने चोळला जातो.तसेच योनीमध्येदेखील बोटे आतबाहेर करून लैंगिक उच्च बिंदू येईतोवर ही क्रिया केली जाते. आपल्या समलिंगी किंवा भिन्नलिंगी यौन साथीदाराद्वारे देखील या क्रिया केल्या जातात.

loading image
go to top