
किडनी स्टोनची समस्या सेक्समुळे होणार दुर, वाचा, संशोधन काय म्हणतं
सेक्स ही शारीरिक सुख देणारी बाब आहे. प्रत्येक शरीराला वयाच्या ठरावीक काळानंतर याची गरज असते. लैगिंक संबंध माणसाला शारीरीक आणि मानसिकरित्या निरोगी ठेवतात. तुम्हाला माहिती आहे का की लैगिंक संबंध ठेवणे, एक चांगला उत्तम व्यायाम देखील आहे. हो. हे खरंय आहे. याशिवाय सेक्स काही रोग (Diseases) देखील दूर करतात.
एका संशोधनात असे आढळून आले आहे की, सेक्स केल्यास किडनी स्टोनच्या समस्येवर आपल्याला मात करता येतो. (according to research sex helps to recover from kidney stone)
हेही वाचा: मुलांनो, लग्नाआधीच या ५ सवयी सोडून द्या नाहीतर...
तुर्कीमध्ये झालेल्या एका संशोधनाच्या मते आठवड्यातून किमान तीन ते चार वेळा शारीरिक संबंध प्रस्थापित केले तर किडनी स्टोन स्वतःच निघून जातात. यावर भारतातील यूरोलॉजिस्ट डॉक्टरनेही सहमती दर्शवली आहे. तुर्कीमधील अंकारा ट्रेनिंग अँड रिसर्च हॉस्पिटलच्या क्लिनिकमधील संशोधकांनी 75 सहभागींवर हे संशोधन केले होते.
हेही वाचा: या सरकारी योजनेंतर्गत ५ लाखांपर्यंचे आरोग्य उपचार मोफत मिळणार
युरोलॉजिस्टच्या मते सेक्स दरम्यान नायट्रस ऑक्साईड शरीरात उत्सर्जित केले जाते आणि ते मूत्रमार्गातून बाहेर पडते. सेक्स करताना हे नायट्रस ऑक्साईड उत्सर्जित केल्यावर मूत्रमार्गाच्या स्नायूंना खूप आराम मिळतो, त्यामुळे किडनीच्या रुग्णाला बरे वाटते.
याशिवाय किडनी स्टोनच्या रुग्णाला सेक्स करण्याचा सल्ला देणे योग्य नसल्याचंही तज्ञानी म्हटलय. किडनी स्टोन बरा करण्यासाठी सेक्स करण्याऐवजी जास्तीत जास्त पाणी प्या, असाही सल्ला तज्ञांनी दिलाय.
Web Title: Sex Helps To Recover From Kidney Stone
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..