Sex Life: सेक्स दरम्यान कंडोम फाटू नये म्हणून ट्राय करा 'या' सहा ट्रिक्स

आम्ही तुम्हाला काही टिप्स देणार आहोत ज्यामुळे तुमचे कंडोम कधीही फाटणार नाही
sex life
sex lifesakal
Updated on

Sex Life: सुरक्षितरित्या लैगिंक संबंध ठेवताना कंडोमचा वापर करणे गरजेचे आहे. पण अनेकदा सेक्स दरम्यान कंडोम कट होते किंवा फाटते आणि त्यामुळे कंडोम वापरण्यामागील उद्देश वाया जातो. मात्र का कंडोम फाटतो, यामागील कारण तुम्ही शोधलं का? आज आम्ही तुम्हाला काही टिप्स देणार आहोत ज्यामुळे तुमचे कंडोम कधीही फाटणार नाही आणि तुम्ही सुरक्षितरित्या लैगिंक संबंध ठेवू शकाल. ( sex life: try these tips or tricks to avoid breaking of condom during sexual intercourse)

sex life
Sex life: सुखी सेक्स लाईफसाठी पतीने या ८ गोष्टी करणं आवश्यक

१. जेव्हा तुम्ही कंडोमला ठेवता तेव्हा काळजी घ्या की तिथे ऊन नको पडायला. कंडोमला नेहमी थंड जागेवर स्टोर करा. जास्त थंड जागेवरही कंडोम ठेवू नका. यामुळे कंडोम कमजोर होऊ शकतं आणि वापरताना तुटू शकतं.

२. वॅसलीन, नारळाचे तेल या लोशनचा ल्यूब्रिकेंट सारखा वापर करु नये. हे ऑइल बेस्ड ल्यूब्स लॅटेक्स कोंडम आहे जे खुप बारीक बारीक छिद्र करू शकतात जे सुरक्षेच्या दृष्टीने हानिकारकही ठरू शकते.

sex life
Condom Shopping: मुंबईकरांनी मोडले कंडोम खरेदीचे रेकॉर्ड; गेल्या बारा महिन्यात विक्रमी वाढ

३. काही लोक सुरक्षेच्या पोटी कधी कधी दोन दोन कंडोम वापरण्याचा वापर करतात. मात्र हे चुकीचे आहे. कारण कंडोमचे डिजाइनच असे आहे की तुम्ही याला सिंगल पीस म्हणूनच वापर करू शकता पण जर तुम्ही डबल लेअर करुन वापरणार तर फ्रिक्शन होऊन कंडोम फाटण्याची शक्यता वाढते.

४. पहिल्यांदा जर तुम्ही कंडोमचा वापर करत असाल तर आधी कंडोम कसे वापरायचे, हे शिकून घ्या. कारण जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने कंडोमचा वापर केला सेक्स दरम्यान हे फाटण्याची शक्यता अधिक वाढते आणि तुम्ही प्रोटेक्शनपासून दुर राहता.

sex life
'मुलींनी Condom विकलं तर बिघडलं कुठे!'

५. जर तुमच्या पार्टनरला ड्राईनेसची समस्या असेल तर ल्यूबचा वापर करा. जर तुम्ही ल्यूबचा वापर करत नसाल तर वापरताना कंडोम फाटण्याची शक्यता अधिक असते. ड्राई एरियामध्ये जास्त फ्रिक्शन निर्माण होते ज्यामुळे कंडोम फाटू शकतो. त्यामुळे lube वापरताना मागे पुढे पाहू नका.

६. असा कंडोम नेहमी खरेदी करा जो फीट बसणार. जर कंडोम जास्त लहान असला की टाइट होऊन तो फाटू शकतो. सोबतच पैसे वाचविण्यासाठी स्वस्तात फसू नका. अशा कंपनीचा कंडोम घ्या जो सुरक्षित आणि क्वॉलिटीचा असणार.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com