
Condom Shopping: मुंबईकरांनी मोडले कंडोम खरेदीचे रेकॉर्ड; गेल्या बारा महिन्यात विक्रमी वाढ
ऑनलाईन शॉपिंग ही गोष्ट आता नवीन राहिलेली नाही. ऑनलाईन शॉपिंगमुळे घरबसल्या हवं ते सामान मागवता येतं. यामध्येच मुंबईकरांनी सर्वाधिक मागवलेली गोष्ट कोणती हे कळलं तर तुम्हालाही आश्चर्य वाटेल. ऑनलाईन माध्यमातून मुंबईकरांनी कंडोम्सची विक्रमी खरेदी केलीय.
स्विगी या फूड डिलीव्हरी कंपनीच्या माध्यमातून आता फळं, औषधं, घरी लागणाऱ्या वस्तू या सगळ्याची डिलीव्हरीही स्विगी इन्स्टामार्टच्या माध्यमातून नव्यानं पुरवण्यात येत आहे. त्यांनी याविषयीची माहिती दिली आहे. मुंबईकरांनी मागच्या वर्षभराच्या तुलनेत गेल्या १२ महिन्यांमध्ये ५७० पट अधिक कंडोम्स खरेदी केले आहेत.
सध्या हे इन्स्टामार्ट बंगळुरू, मुंबई, हैदराबाद, दिल्ली, चेन्नई इथं मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. या शहरांमध्येही सॅनिटरी नॅपकिन्स, मेन्स्ट्रुअल कप, टॅम्पॉन अशा वस्तूंच्या खरेदीमध्ये मोठी वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. सध्या या अॅपवरून अंडी, कंडोम्स, सॅनिटरी नॅपकीन आणि टॅम्पॉन सर्वाधिक मागवले जात असल्याचं आढळून आलं आहे. गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी या गोष्टींच्या ऑनलाईन ऑर्डरमध्ये १६ पटींनी वाढ झाली आहे.