
Navratri 2025 wishes
Sakal
शारदीय नवरात्री 22 सप्टेंबरपासून सुरू होत आहे.
या नऊ रात्रींमध्ये माता दुर्गेच्या नऊ रूपांचे पूजन करून भक्त समृद्धी, शांती आणि आनंदाची प्रार्थना करतात.
या सणाच्या निमित्ताने नातेवाईक आणि मित्रपरिवाराला भक्तीमय शुभेच्छा पाठवून उत्सवाचा आनंद द्विगुणित करा.
Sharadiya Navratri Greetings: हिंदू धर्मात नवपारात्रीला खुप महत्व आहे. यंदा 22 सप्टेंबरला शारदीय नवरात्री साजरी केली जाणार आहे. या नऊ रात्रींच्या पवित्र काळात माता दुर्गेच्या नऊ रूपांचे पूजन करून भक्त आपल्या जीवनात समृद्धी, शांती आणि आनंद मागतात.
शारदीय नवरात्र हा माता दुर्गाच्या सन्मानार्थ साजरा केला जाणारा एक वार्षिक हिंदू सण आहे. नवरात्र म्हणजे नऊ रात्रींचा समूह असा शब्दशः अर्थ होत असून हा सण नऊ रात्री साजरा होतो. या सणाच्या निमित्ताने नातेवाईक आणि मित्रपरिवाराला भक्तीमय शुभेच्छा पाठवून उत्सवाचा आनंद द्विगुणित करा.