
रेशीमनाती - शर्वरी लोहोकरे आणि ओमप्रकाश शिंदे
अभिनय क्षेत्रात अनेक कलाकारांना एकत्र काम करताना मैत्रीचे नवीन बंध जुळताना पाहायला मिळतात. अशीच एक खास मैत्री अभिनेत्री शर्वरी लोहोकरे आणि अभिनेता ओमप्रकाश शिंदे यांची आहे. झी मराठीवरील ‘खुलता कळी खुलेना’ या मालिकेच्या सेटवर भेटलेले हे दोघे आता एकमेकांचे अतिशय जिवलग मित्र झाले आहेत.