महिलांचे मनोबल वाढवणारे व्यासपीठ

मी कंप्युटर सायन्सची पदवी घेऊन एका खासगी कंपनीत नोकरी करत होते. महिला म्हणून स्वतःची ओळख निर्माण करण्याची जबाबदारी माझ्यावर होतीच आणि त्यासाठी माझ्या कामातून पुरेपूर प्रयत्नही करत होते.
 she work platform to empower women
she work platform to empower womenSakal

- पूजा बांगड

मी कंप्युटर सायन्सची पदवी घेऊन एका खासगी कंपनीत नोकरी करत होते. महिला म्हणून स्वतःची ओळख निर्माण करण्याची जबाबदारी माझ्यावर होतीच आणि त्यासाठी माझ्या कामातून पुरेपूर प्रयत्नही करत होते.

मात्र, एका वैयक्तिक अनुभवातून मी इतर महिलांसाठी काही तरी करण्याचा निर्णय घेतला आणि महिला सक्षमीकरणाच्या उद्देशाने २०१९ मध्ये ‘शीवर्क’ची (SheWork) सुरुवात केली. महिलांना नेहमीच करिअर करताना कुटुंब आणि नोकरी यांपैकी एकावर जास्त लक्ष केंद्रित करावे लागते. यामुळे त्यांची सतत तारेवरची कसरत सुरूच असते.

काही वेळा या सर्वांतून ‘ब्रेक’देखील घ्यावा लागतो. अशा महिलांसाठी आपण काही तरी करावं, या प्रेरणेने ‘शीवर्क’चा पाया रचला गेला!

उद्योगाची प्रेरणा

मी काही वर्षे एका खासगी कंपनीमध्ये नोकरी केली. नोकरी करताना परदेशात जाऊन काही नवीन करता येईल का? याचा मी विचार करत होते, तर नोकरीच्या ठिकाणी ही संधी उपलब्ध झाली होती. मात्र, माझ्या ऐवजी माझ्या सहकाऱ्याला म्हणजेच एका पुरुषाला संधी देण्यात आली.

त्या क्षणी मला आश्‍चर्याचा धक्का बसला. बरोबरीने काम करून आणि माझ्यामध्ये तितकी क्षमता असतानादेखील एका पुरुषाला ही संधी मिळाली, पण मला नाही मिळाली. या अनपेक्षित अनुभवातून मी निर्णय घेतला की, मी स्वतःच काही तरी सुरू करावं. याच विचारातून मी ‘शीवर्क’ची स्थापना केली. मी स्वतः महिलांसाठी संधी उपलब्ध करून द्यायला हवी या विचारांतून या उद्योगाची सुरुवात केली. महिलांना त्यांच्या आवडीचे प्रोजेक्ट मिळवून देणारे पर्याय आम्ही एका व्यासपीठावर आणले आहेत.

अनुभव आणि आव्हाने

उद्योग सुरू केल्यानंतर असे समजले की, माझ्यासारखे अनुभव अनेक महिलांना येत आहेत. मुळात महिलांना कंपनीमध्ये रुजू करून घेताना आजही त्यांच्या भविष्यातील प्रसंगांचा विचार केला जातो. जसे की तिचे लग्न, बाळंतपण. बाळंतपणामुळे आपले करिअर तात्पुरते किंवा कायमचे सोडणाऱ्या महिलांचे प्रमाण जास्त आहे. बाळंतपणासह विविध कारणांमुळे करिअरमध्ये ब्रेक घेतलेल्यांना पुन्हा नोकरी शोधताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. एकदा नोकरी सोडल्यावर पुन्हा त्याच गुणवत्तेची आणि तशाच पद्धतीचे काम उपलब्ध करून देणारी नोकरी मिळणे अवघड असते.

करिअरमधला हा ब्रेक पुढच्या प्रवासासाठी अडथळा ठरतो. त्यानंतर नोकरी शोधण्याची सर्व प्रक्रिया त्रासदायक ठरते. ‘शीवर्क’च्या माध्यमातून कंपन्यांना कुशल आणि अनुभवी महिलांचे मनुष्यबळ उपलब्ध होते. या क्षेत्रातील एक मुख्य आव्हान म्हणजे, समाजातील स्थिती आणि परंपरा. आम्ही लोकांच्या मनातील अशी विषमता दूर व्हावी यासाठी काम करतो. इतर लोकांचं आणि प्रसंगी महिला किंवा मुलींचही मनोबल वाढवणं हे आमच्या समोरचं मुख्य आव्हान आहे.

(शब्दांकन ः सुचिता गायकवाड)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com