esakal | सोन्याचं पान खा फक्त ६०० रुपयात, व्हिडीओ व्हायरल

बोलून बातमी शोधा

सोन्याचं पान खा फक्त ६०० रुपयात, व्हिडीओ व्हायरल

या विड्याच्या पानाची आहे खास खासियत

सोन्याचं पान खा फक्त ६०० रुपयात, व्हिडीओ व्हायरल

sakal_logo
By
शर्वरी जोशी

जेवण झाल्यावर अनेकांना विड्याचं पान खाण्याची सवय असते. त्यामुळे आजही अनेक घरांमध्ये अडकित्ता, सुपारी आणि विड्याची पानं असं एका ताटात छान मांडून ठेवलेलं दिसतं. पूर्वी केवळ घरांमध्ये किंवा लग्नसोहळ्यांमध्ये दिलं जाणारं हे पान आता सहजपणे कुठेही मिळतं. त्यामुळे आजकाल ठिकठिकाणी पान शॉप आहेत. यात अनेक पान शॉप खास त्यांच्या स्पेशल पानांमुळे ओळखले जातात. यात गोड पान, चॉकलेट पान, फायर पान असे विविध प्रकार या पान शॉपमध्ये पाहायला मिळतात. परंतु, कधी सोन्याचं पान ऐकलं आहे का?  नाही ना..पण, दिल्लीतील एका पान शॉपमध्ये चक्क सोन्याचं पान विकलं जात आहे. विशेष म्हणजे या एका पानाची किंमत थोडीथोडकी नसून तब्बल ६०० रुपये आहे. 

दिल्लीतील Connaught Place येथे असलेल्या यमू की पंचायत या पान शॉपमध्ये चक्क सोन्याचं पान मिळतं. या पानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.  विशेष म्हणजे हे सोन्याचं पान खाण्यासाठी लोक लांबून येत आहेत. या पानाच्या वैशिष्ट्याप्रमाणेच त्याचं नावदेखील अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे. या पानाचं नाव रफेलो गोल्ड पान असं आहे.

यमू की पंचायतच्या इन्स्टाग्राम पेजवर सोन्याच्या पानाचा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून  हे आहे ६०० रुपयांचं रफेलो गोल्ड पान, असं कॅप्शन या व्हिडीओला दिलं आहे.

हेही वाचा : धारावी ते कुलाबा कॉझवे ! खरेदीसाठी मुंबईतील ५ फेमस मार्केट

काय आहे पानाची खासियत?

या पानामध्ये सुक खोबरं, खारीक, वेलची, गोड चटणी, गुलकंद, लवंग आणि चेरी ठेवण्यात आली असून या पानाला सोन्याचा वर्क लावला आहे.