esakal | Shopping Tips : ओरिजनल लेदरची बॅग कशी ओळखावी?
sakal

बोलून बातमी शोधा

Shopping Tips : ओरिजनल लेदरची बॅग कशी ओळखावी?

Shopping Tips : ओरिजनल लेदरची बॅग कशी ओळखावी?

sakal_logo
By
शर्वरी जोशी

कोणतीही स्त्री शॉपिंगला बाहेर पडली की तिच्या हातात लहानशी का होईना एखादी पर्स किंवा बॅग असतेच असते. त्यामुळे तसं पाहायला गेलं तर पर्स म्हणजे स्त्रियांच्या जिव्हाळ्याचा विषय. बाजारातही आता वेगवेगळ्या ब्रॅण्ड, आकार, मटेरिअलच्या पर्स उपलब्ध आहेत. मात्र, आजही अनेक स्त्रियांची पहिली पसंती लेदर पर्स किंवा बॅगलाच आहे. लेदरची कोणतीही वस्तू विकत घ्यायची झालं तरी त्यासाठी मोठी रक्कम मोजावी लागते. यातही अनेकदा लेदरच्या नावाखाली एखादा लोकल ब्रॅण्ड ग्राहकांच्या माथी मारला जातो. त्यामुळे ओरिजनल लेदर कसं ओळखावं ते जाणून घेऊयात. (shopping-tips-how-to-check-real-and-fake-leather-purse)

१. टेक्सचरचा फरक -

बनावट आणि ओरिजनल लेदरमध्ये सगळ्यात मोठा फरक असतो तो म्हणजे टेक्सचरचा किंवा पॅटर्नचा. ओरिजनल लेदर चामड्यापासून तयार केलं जातं. त्यामुळे त्याची लवचिकता जास्त असते. तसंच त्याची फिनिशिंगही उत्तमरित्या केलेली असते. मात्र, जर लेदर बनावट असेल तर त्याची लवचिकता कमी असते. तसंच त्याचं फिनिशिंगही व्यवस्थित केलेलं नसतं. तसंच ओरिजनल लेदरच्या किंमतीपेक्षा याची किंमत अत्यंत कमी असते. लेदरच्या वस्तू तयार करण्यासाठी बराच वेळ लागतो त्यामुळे त्या वस्तूदेखील महाग असतात.

हेही वाचा: A रक्तगट असणाऱ्यांनी चुकूनही खाऊ नका नॉनव्हेज!

२. वासावरुन ओळखा -

ओरिजनल लेदरमधून एक विशिष्ट प्रकारचा वास येतो. लेदर हे प्राण्यांच्या चामडीपासून तयार केलं जातं. त्यामुळे त्याला प्राण्यांच्या कातडीचा एक विशिष्ट वास येत असतो. तुलनेने जर लेदर बनावट असेल तर त्याला प्लास्टिकचा वास येतो.

३. पॅटर्न -

ज्याप्रमाणे आपल्या शरीरावर रेषा, सुरकुत्या असतात तसंच लेदरवरदेखील असतं. अनेकदा त्यावर काही डागदेखील असतात. पण, जर तुमच्या समोर पॉलिश केलेलं चकचकीत लेदर ठेवलं तर समजून जा हे बनावट लेदर आहे.

४. रंग -

जर लेदर ओरिजनल असेल तर ते घासल्यानंतर त्याचा रंग बदलतो आणि ते फिकट रंगाचं होतं. तसंच त्यावर लगेच सुरकुत्याही पडतात. मात्र, बनावट लेदर असेल तर त्याचा रंग बदलत नाही. ते फोल्ड केल्यावर त्याची घडी पडत नाही किंवा सुरकुत्याही येत नाहीत.

५. पाणी -

लेदरच्या बॅगवर पाण्याचे काही थेंब टाकले तर ते लगेच शोषून घेतात. मात्र, लेदर बनावट असेल तर कितीही पाणी टाकलं तरीदेखील ते पाणी बॅगवर टिकत नाही.

loading image