Short hari hairstyle: तुमचे केस लहान असतील तर 'या' हेअरस्टाईल करून केसांना द्या ट्रेडिशनल लुक

तुमची हेअरस्टाईल तुमचे खरे सौदर्य खुलवते असते.
Short hari hairstyle
Short hari hairstyleEsakal

तुमची हेअरस्टाईल तुमचे खरे सौदर्य खुलवते असते.

भारतीय सणांच्या मध्ये होम डेकोर करणे आणि मस्त नटुन थटून तयार होणे या दोन्ही गोष्टी महिला मुली विशेषतः करतातच,या सणासाठी आधीच मुलीची कपडे ज्वेलरी या गोष्टीची खरेदी सुरू झालेली असते. पण चांगले कपडे चांगली ज्वेलरी घालुनच भारी लुक येत नाही तर साठी तुमची हेअरस्टाइल सुद्धा उत्तम असणे गरजेचे असते.जर का तुमचे केस लहान लहान असतील तर नेमकी कशी हेअरस्टाइल करावी हा प्रश्न तुम्हाला पडला असेल?

चला तर या लेखातून आम्ही तुम्हाला लहान केसांच्या वेगवेगळ्या हेअरस्टाईल कशा करता येतील याची सविस्तर माहिती देणार आहोत.

समजा जर तुमचे केस लहान असतील तर तुम्ही अशा काही हेअरस्टाइलचा करू शकता, जे तुमच्या पारंपारिक लुकला अगदी पूरक ठरतील. चला तर बघू या पारंपारिक लुकसाठी लहान केसांची हेअरस्टाइल

Short hari hairstyle
वेस्टर्न लूकवर अशी करा हटके हेअरस्टाईल

● मेस्सी बन हेअरस्टाईल

साडी, लेहेंगा किंवा नऊवारी असा पारंपारिक पोशाखा तुम्ही परिधान केला असेल तर त्यावर तुम्ही मेस्सी बन तयार करु शकता. ही हेअरस्टाइल सुंदर दिसते, तसेच लहान केसांमध्येही ही स्टाइल करता येते. या हेअरस्टाईलला अॅक्सेसरीजसह अधिक आकर्षक तुम्ही बनवू शकता.

● लाॅन्ग साॅफ्ट कर्ल हेअर स्टाइल

लाॅन्ग साॅफ्ट कर्ल ही देखील हेअर स्टाइल तुम्ही करू.शकता. ही हेअरस्टाईल अतिशय आधुनिक लुक देते. ही हेअर स्टाइल पारंपारिक आणि पाश्चात्य अशा दोन्ही प्रकारच्या आउटफिट्समध्ये तुम्ही ही हेअरस्टाईल करू शकता.

● मोकळे केस

सूटपासून लेहेंगा किंवा साडीपर्यंत तुम्ही ही मोकळ्या केसांची स्टाइल करू शकता. सेंटर पार्टेड हेअरस्टाईलमध्ये तुम्ही सॉफ्ट कर्ल्स देऊन हेअरस्टाईलसोबत ट्रेंडी लुक देऊ शकता. या प्रकारच्या हेअरस्टाइलसह छान मोठे झुमके घालुन तुम्ही तुमचे सौदर्य वाढवून शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com