कमी वयात पालक होत असाल तर 'या' गोष्टींची घ्या काळजी

कमी वयात पालक झालेल्या जोडप्यांनी अशी हाताळा परिस्थिती
mother son
mother sonesakal
Updated on

घरात एखाद्या चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं की संपूर्ण घर आनंदून जातं. मात्र, एक लहान मूल वाढवणं, त्याचं संगोपन करणं ही गोष्ट वाटते तितकी सोपी नसते. एक लहान मुलाचा सांभाळ करणं ही फार मोठी जबाबदारी असते. त्यामुळेच मानसिक व आर्थिकदृष्ट्या स्थिर असलेले दाम्पत्य फॅमिली प्लानिंग Family Planing करण्याचा विचार करतात. मात्र, अनेकदा कमी वयातच जोडप्यांवर पालकत्वाची जबाबदारी येते. त्यामुळे कमी वयात ही मोठी जबाबदारी पेलताना अनेक जण घाबरुन जातात. म्हणूनच, कमी वयात पालक झालेल्या कपल्सने ही परिस्थिती कशी हाताळावी ते पाहुयात. (parenting tips should be known to women who become mothers at a young age)

१. प्लानिंग करा -

मुलांचं संगोपन करणं, त्यांना लहानाचं मोठं करणं ही साधी गोष्ट नाही. त्यामुळे जर कमी वयात पालकत्व स्वीकारताना प्रत्येक गोष्टीचं प्लानिंग म्हणजेच नियोजन करणं अत्यंत गरजेचं आहे. ज्यामुळे ऐनवेळी तुमचा गोंधळ होणार नाही. जर तुम्ही जॉब करत असाल तर ऑफिसच्या वेळा आणि बाळाचं संगोपन याचा मेळ साधण्याचा प्रयत्न करा. त्यानुसार, तुमच्या दिवसाचं शेड्युल आखून घ्या. गरजेचं त्यासाठी तुम्ही घरातील वडीलधाऱ्या मंडळींची मदत घेऊ शकता.

२. स्वत:ची काळजी घ्या -

कमी वयात आई झाल्यामुळे स्त्रियांच्या मनावर बऱ्याच गोष्टींचं दडपण असतं. त्यामुळे अनेक स्त्रिया सतत विचारांमध्ये गुंतलेल्या असतात. अशा परिस्थितीत त्यांना स्वत:कडे व बाळाकडेही नीट लक्ष देता येत नाही. यात अनेकदा स्त्रियांचं जेवणाकडे दुर्लक्ष होतं, घरातील किंवा ऑफिसच्या कामात लक्ष लागत नाही. एकंदरीत या सगळ्या प्रकारात स्त्रियांची मानसिक व शारीरिक हानी होत असते. त्यामुळे स्वत:ची काळजी घेणं गरजेचं आहे.

mother son
'माझी ती इच्छा पूर्ण झाली'; विजय कदम यांनी व्यक्त केल्या भावना

३. घाबरु नका -

आई होण्याचा आनंद कितीही पट जास्त असला तरीदेखील कमी वयात आई झाल्यामुळे अनेक स्त्रियांना पुरेशी समज नसते. त्यामुळे बाळ खूप रडायला लागलं किंवा त्याला काही झालं की स्त्रिया घाबरुन जातात. त्यामुळे अशा परिस्थितीत घाबरु नका. वेळ पडली तर घरातील वडीलधाऱ्या स्त्रियांचा वा डॉक्टरांचा सल्ला घ्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com