
चित्रपट, नाटक अशा विविध माध्यमातून अविरतपणे प्रेक्षकांचं मनोरंजन करणारे अभिनेता म्हणजे विजय कदम. ८०-९० चा काळ गाजवणाऱ्या विजय कदम यांनी 'टूरटूर', 'सही दे सही', 'इरसाल कार्टी', 'गोळाबेरीज', 'ऑन ड्युटी २४ तास' अशा अनेक नाटक, चित्रपटांमध्ये काम करुन प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. विनोदाचं उत्तम टायमिंग आणि अभिनयशैली यांमुळे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे विजय कदम पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाले आहेत. 'ती परत आलीये' या नव्या मालिकेतून विजय कदम छोट्या पडद्यावर झळकणार असून या निमित्ताने त्यांच्या बोलीभाषेचा अंदाज प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. (marathi tv show ti parat aaliye actor vijay kadam set to entertain audience on small screen)
सोशल मीडियावर सध्या 'ती परत आलीये' या मालिकेची जोरदार चर्चा रंगली आहे. सस्पेन्स थ्रिलर असलेल्या या मालिकेचा प्रोमो अलिकडेच प्रदर्शित झाला. या प्रोमोमध्ये अभिनेता विजय कदम कोकणी भाषेत बोलत असून ते या मालिकेत मुख्य भूमिका साकारणार असल्याचं दिसून येत आहे.
"ती परत आलीये या मालिकेत मी बाबूराव तांडेल ही अत्यंत वेगळ्या आणि चौकटी बाहेरची भूमिका साकारत आहे. त्यामुळे ही मालिका माझ्यासाठी फार खास आहे. या मालिकेत मी विजय कदम न वाटता वेगळाच कोणी तरी असल्याचं जाणवत आहे. साडे चार महिन्यांपूर्वी निलेश मयेकर यांनी मला या मालिकेविषयी सांगितलं होतं. त्यावेळी मी तातडीने माझा होकार कळवला होता. कारण, जी बोलीभाषा मी लहानपणापासून बोलतोय, ऐकतोय त्याच भाषेत आज मला भूमिका करायला मिळतीये", असं विजय कदम म्हणाले.
पुढे ते म्हणतात, "साधारणपणे कोकणी माणूस स्पष्टवक्ता असतो. तसाच हा बाबूराव आहे. परंतु, तो फार धाडसी असल्याचं लोकांना भासवतो. मात्र, प्रत्यक्षात तो सुद्धा प्रचंड भित्रा आहे. मी सस्पेन्स थ्रिलर खूप पाहिले आहेत आणि त्या शैलीमध्ये काम करण्याची माझी इच्छा होती. जी या मालिकेमुळे पूर्ण झाली आहे. या मालिकेत मला एका उत्तम भूमिका साकारायला मिळतेय, या कथानकाचा सूत्रधार मी असल्यामुळे मला काम करताना खूप मजा येतेय."
दरम्यान, ती परत आलीये ही नवी मालिका येत्या १६ ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत विजय कदम मुख्य भूमिका साकारत असले तरीदेखील ती म्हणजे नेमकी कोण याविषयी प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.