मासिक पाळीमध्ये वर्कआऊट करावे की नाही? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

मासिक पाळीमध्ये वर्कआऊट करावे की नाही? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

मासिक पाळी (Period)ही सामान्य नैसर्गिक क्रिया आहे. सामन्यत; १२ वर्षानंतर मुलींना मासिक पाळी येते, जी साधारण ४४-५५ वर्ष मॅनोपॉज (Menopause) येईपर्यंत असते. या काळात मुली, महिलांमध्ये खूप हार्मोनल आणि शारिरिक बदल (Hormonal and physical changes)होतात, ज्यामुळे मूड स्विंग, राग येणे, चिडचिड होणे, आणि इमोशनल होणे सामान्य गोष्ट आहे

त्याशिवाय काही माहिलांना मासिक पाळीच्या काळात सहनक्षमतेच्या पलीकडे त्रास होतो तर काहींना सामान्य त्रास होतो. ज्या मुलींना त्रास होत नाही त्या (Exercise)सोडून सर्व काम नेहमी प्रमाणे करू करतात. बहूतेक मुली या काळात व्यायाम करणे सोडून देतात कारण, त्यांनी असे ऐकले असते की, मासिक पाळीच्या काळात व्यायाम करू नये पण, याबाबत तज्ज्ञांचे काय मत आहे? जाणून घेऊ या

Period
Period
मासिक पाळीमध्ये वर्कआऊट करावे की नाही? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत
Weight Loss : वजन कमी करायचेय? निगेटिव्ह कॅलरी असलेले पदार्थ खा

मासिक पाळीमध्ये व्यायाम करावा की नाही?

एक्सपर्टच्या मतानुसार ''मासिक पाळीमध्ये व्यायाम करू नये'' ही एक अफवा आहे जी खूप काळापासून पसरली आहे. मासिक पाळीमध्ये व्यायाम करणे फायदेशीर असते पण ते महिलांच्या बॉडी टाईपवर डिपेंट असते. जर कोणाला खूप क्रॅम्प येत असतील किंवा खूप पोट दुखत असेल तर मासिक पाळीच्या सुरूवातीच्या १-२ दिवस व्यायाम करू नका. आराम करून बरे वाटल्यानंतर व्यायाम करू शकता.

डॉ. क्रिस्टोफर हॉलिग्सवर्थ (Dr. Christopher Holligsworth) यांच्या माहितीनुसार, मासिक पाळीच्या काळात हार्मोनल बदलांच्या दृष्टीने सर्वात अवघड काळ असतो. या काळात शरीरामध्ये प्रोजस्टोन आणि एस्ट्रोजन दोन्हींची पातळी कमी होते, ज्यामुळे शरीराला जास्त थकवा जाणवतो. पण जर कोणाला थकवा आणि अशकत्तपणा जाणवत नसेल तर सोपी व्यायाम करू शकता.

मासिक पाळीच्या काळात चिडचिड होत असते पण कोणी या काळआत व्यायाम केली तर त्याचा मूड चांगला राहतो आणि या दिवसांमध्ये होणारे काही सामान्य त्रास कमी होतात.

Yoga Tips
Yoga Tipssystem
मासिक पाळीमध्ये वर्कआऊट करावे की नाही? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत
लसीकरणानंतर मासिक पाळी थोडी उशीरा येऊ शकते: संशोधनाचा निष्कर्ष

एक्सपर्टनुसार मासिक पाळीच्या काळात व्यायाम करण्याचे फायदे

PMSची लक्षण कमी होतात.

मासिक पाळी सूरू येण्याच्या आधी काही लक्षणांवरून आपल्याला समजते ज्यामध्ये थकवा, चिडचिड, राग इ. समावेश आहे. त्यांनी प्री-मेंस्ट्रअल सिंड्रोम (PMS)म्हणतात.व्यायाम करण्याआधी लक्षणे कमी होऊ शकतात. या लक्षणांना कमी करण्यासाठी सोपी अॅरोबिक्स करू शकता.

दुखणे कमी होते आणि मूड फ्रेश होतो

व्यायाम केल्यामुळे शरीरामध्ये नॅचरल एंडर्फिन हार्मोन वाढते, जे मूड चांगला करण्यासाठी फायेदशीर ठरते आणि उदास करण्याऱ्या PMS लक्षणांना कमी करते. एंडोर्फिन एक नैसर्गिक वेदनाशामक(Painkiller)आहे जे व्यायाम केल्यामुळे शरीरामध्ये सोडले जाते. मासिक पाळीच्या काळात व्यायाम करण्यामुळे हार्मोन रिलीज होतात आणि वेदणेपासून आराम मिळतो.

मासिक पाळीमध्ये वर्कआऊट करावे की नाही? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत
मासिक पाळी दरम्यान आंघोळ करण्याची योग्य पद्धत माहितीये?
breathing exercises
breathing exercises

ताकद वाढवते

एका संशोधनानुसार, मेनस्ट्रल सायकलच्या आधी २ आठवडे (ज्या दिवशी पाळी येते तो पहिला दिवस मानतात) हार्मोन्सची पातळी कमी होण्यामुळे ताकद कमी होते पण जर कोणी या दिवसामध्ये व्यायाम केले तर तुम्हाला ताकद असल्याचे जाणवते.

मूड चांगला राहतो

व्यायाम केल्याने शरीरामध्ये रक्ताभिसरण खूप चांगल्या पध्दतीने होतो जे थेट मेंदूपर्यंत पोहचते. त्यामुळे मेंदू व्यवस्थित काम करतो आणि तुम्ही आनंदी असल्याचे जाणवते.

वेदनादायक मासिक पाळीपासून सुटका

काही महिलांना मासिक पाळीमध्ये खूप त्रास होतो. जर कोणी नियमित व्यायाम करत असेल तर त्यांना या त्रासापासून सुटका मिळू शकते, वॉक करणे, पटपट चालते, काही सोप्या व्यायाम करणे ही लक्षणे कमी करण्यासाठी मदत करतात.

मासिक पाळीमध्ये वर्कआऊट करावे की नाही? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत
लग्नात पाळी येणार म्हणून त्रासला आहात? हे घरगुती उपाय करा
workout
workoutesakal

मासिक पाळीमध्ये कोणतीव्यायाम करणे फायदेशीर असते?

एक्सपर्टच्या मतानुसार, मासिक पाळीच्या काळात सोप्या सोप्या व्यायाम करणे फायदेशीर ठरते, ज्यामध्ये कमीत कमी मिडीयम इंटेसिटीची व्यायाम येते. योगा, पटपट चालणे, स्विमिंग, डान्स देखील करू शकता. पण यांची वेळ ३० मिनिट असावी. याशिवाय अशी व्यायाम करू नका ज्यामध्ये तुमचे पाय पोटाच्या वर जातील म्हणजेच पाय आणि छाटीमध्ये ९० डिग्री अँगल नसला पाहिजे. क्रंचेस, सीटअप सारख्या व्यायाम करू नका.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com