Shravan Month 2025: पहिल्या श्रावणी सोमवारी लक्षात ठेवा 'या' गोष्टी, आयुष्यात मिळेल यश

First Shravan Somwar 2025 Rituals For Success : हिंदू धर्मात श्रावण महिन्याला खुप महत्व आहे. या महिन्यात महादेवाची मनोभावे पुजा केली जाते.
First Shravani Somvar rituals for prosperity
First Shravani Somvar rituals for prosperitySakal
Updated on
Summary
  1. पवित्र स्नान करून दूध, मध आणि बेलपत्रांनी रुद्राभिषेक करा, ज्यामुळे भगवान शंकरांचा आशीर्वाद आणि समृद्धी मिळेल.

  2. श्रावणी सोमवारचा कठोर उपवास पाळा, कांदा, लसूण आणि मांसाहारी पदार्थ टाळून आध्यात्मिक प्रगती साधा.

  3. “ॐ नमः शिवाय” किंवा महामृत्युंजय मंत्र 108 वेळा जप करा आणि शिवलिंगावर गंगा जल अर्पण करा यश आणि शांतीसाठी.

Shravan Somwar 2025 Success Tips: हिंदू धर्मात श्रावण महिन्याला खुप महत्व आहे. यंदा २५ जुलैपासून श्रावण महिना सुरू झाला आहे. आज पहिला श्रावणी सोमवार साजरा केला जात आहे. धार्मिक मान्यतेनुसार श्रावणात भोलेनाथाची मनोभावे पुजा केल्यास आयुष्यात भरभराट येते आणि समस्या दूर होतात. तसेच ज्योतिषशास्त्रात या दिवसासंदर्भात काही नियम सांगतिलेले आहेत.

पुढील गोष्टी कराव्या

  • श्रावण सोमवारी भक्तीभावाने व्रत पाळावे.

  • सकाळी लवकर उठून स्नान करून घर आणि मंदिर स्वच्छ करावे.

  • महादेवाच्या पुजेसाठी बेलाचे पान, धोतऱ्याचे पांढरे फुल आणि फळ,दूध ,दही, विभुती या गोष्टींचा समावेश करावा.

  • या दिवशी तामसिक पदार्थांचे सेवन करणे टाळावे.

  • या दिवशी कोणाचाही अपमान करू नये.

  • उपवासा दरम्यान सुकामेवा,फळे, दूधयासारख्या पदार्थांचे सेवन करावे.

  • या दिवशी मनोभावे आणि विधीपुर्ण भगवान शंकराची पुजा करावी.

  • महादेवाला गोकर्णीचे फुल अर्पण करणे शुभ मानले जाते.

First Shravani Somvar rituals for prosperity
Shravaan Vastu Tips: श्रावणात महादेवाला प्रसन्न करण्यासाठी फॉलो करा 'या' वास्तू टिप्स

पुढील गोष्टी करणे टाळा

  • भगवान शंकराला पुजेदरम्यान लाल किंवा केलकीचे फुल अर्पण करणे अशुभ मानले जाते.

  • तसेच महादेवाला हळद आणि कुंकु अर्पण करू नये.

  • या दिवशी कांदा, लसूण आणि मसाल्याच्या पादार्थांचे सेवन टाळावे.

  • याशिवाय, अंडी, मांस, मद्य आणि तंबाखूचे सेवन करणे टाळावे.

  • तसेच श्रावणात बाहेरचे पॅकिंग केलेल पदार्थ खाणे टाळावे. चव वाढवण्यासाठी अनेक गोष्टींचा वापर केला जातो.

Q

2025 मधील पहिल्या श्रावणी सोमवारचे महत्त्व काय आहे?

A

पहिला श्रावणी सोमवारहा भगवान शंकरांची पूजा करण्यासाठी अत्यंत शुभ आहे, जो इच्छा पूर्ण करतो, कर्म शुद्ध करतो आणि यश मिळवतो.

Q

श्रावणी सोमवारची पूजा मंदिराऐवजी घरी करता येईल का?

A

होय, तुम्ही घरी पंचामृत, बेलपत्र आणि गंगा जल वापरून भक्तीपूर्वक रुद्राभिषेक करू शकता.

Q

श्रावणी सोमवारी उपवासात कोणते पदार्थ खावेत?

A

सात्विक आहार जसे की फळे, दूध, साबुदाणा आणि कुट्टू खावे; धान्य, कांदा, लसूण आणि मांसाहारी पदार्थ टाळावेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com